News18 Lokmat

रात्रीस खेळ चाले : ...म्हणून अण्णा काशीला गावभर शोधतायत

शेवंताला भेटायचं वेड काशीच्या डोक्यातून काही जात नाही. तो आपल्या लग्नाचा पोशाख घालून शेवंताकडे येतो.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 06:25 PM IST

रात्रीस खेळ चाले : ...म्हणून अण्णा काशीला गावभर शोधतायत

मुंबई, 05 मे : रात्रीस खेळ चाले मालिकेत प्रत्येक एपिसोडला काही तरी रंजक घडतेय आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढतेय. शेवंताला भेटायचं वेड काशीच्या डोक्यातून काही जात नाही. तो आपल्या लग्नाचा पोशाख घालून शेवंताकडे येतो आणि मी अण्णा नाईक हे नेहमीच्या स्टाइलनं बोलतो.

काशीच्या तोंडून शेवंता आणि अण्णा ही नावं ऐकल्यावर शेवंता हादरते. आता हा बोभाटा सगळीकडे होऊन आपला संसारच दावणीला लागेल, या काळजीनं ती घडलेली घटना अण्णांना सांगते. अगोदरच वच्छीच्या अख्ख्या कुटुंबाकडे रागानं पाहणारे अण्णा या प्रकारानं चवताळतात.

फक्त काही तासांसाठी तब्बल एवढ्या कोटींचे कपडे घालून निघाली प्रियांका चोप्रा

ते सोंगट्याला घेऊन काशीला शोधायला बाहेर पडतात. अख्खा गाव शोधून झाल्यावर अण्णा वच्छीच्या घरी येतात. त्यांना पाहून आबा घाबरून दार लावतात. काशी सापडला तर जिवंत राहणार नाही, अशी धमकी देऊन ते निघून जातात.

दरम्यान शोभा आणि वच्छीही काशीला शोधायला बाहेर पडतात. त्यांनाही काशी गावात सापडत नाही. घरी आल्यानंतर वच्छीला आबाकडून सगळं कळतं. तीही घाबरून जाते. काशी अण्णांच्या समोर येऊ नये म्हणून साकडं घालते.

Loading...

सलमान नाही तर 'हा' अभिनेता आहे कतरीनाचा गुरू, खुद्द भाईजाननंच केला गौप्यस्फोट

इकडे वाड्यात माईंवर मोठं संकट कोसळतं. त्या जिन्यावरून खाली पडतात.   त्यात त्यांना नागिणही होते. सरिता आणि दत्ता त्यांची सेवा करतायत.

अण्णांना नाना म्हणजे त्यांचे वडीलच राक्षस म्हणतायत. अण्णांना दिवसा-उजेडी भूतं दिसतात. पण ती त्यांनाच दिसतात. इथेही मालिकेनं आपण अंधश्रद्धा पसरवत नाही, ही भूमिका घेतलीय. कारण अण्णांनी ज्यांचा खून केला, ती माणसं त्यांना दिसतात. भवरी, नोकर हे फक्त त्यांनाच दिसतात. कारण ते त्यांच्या मनातलं गिल्ट. मनातली भीती अशी समोर दिसतेय.

दीपिका-प्रियांकानंतर आता सुष्मिता सेनच्या घरी वाजणार सनई-चौघडे

तरीही अण्णा काही सुधारणार नाहीत. जेव्हा ते कोणाला ठार मारतात, तेव्हा आंब्याचं कलम लावतात. आता पुढच्या काही एपिसोडमध्ये अण्णा अशी तीन कलमं लावणार आहेत. म्हणजे तिघांचा खून अण्णा करणार.


SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...