रात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार

सरिता हरवल्याची तक्रार अण्णा पोलिसांमध्ये करतात. पोलीस घरी येतात आणि पाहा पुढे काय होतं ते

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 07:34 PM IST

रात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार

मुंबई, 18 एप्रिल : 'रात्रीस खेळ चाले' मालिका दिवसेंदिवस रंजक होत चाललीय. ती प्रेक्षकांना धरून ठेवतेय. उत्सुकता वाढवतेय. त्यात मानवी स्वभावाचे अनेक पैलू सापडतायत. नात्यांचे कंगोरेही खूप विचारपूर्वक मांडलेत. आता गेला आठवडाभर सरिताचाच शोध चाललाय. तो तसाच सुरू राहणार पुढचे काही आठवडे.

अण्णांनी नेने वकिलांच्या सांगण्यावरून पोलिसांमध्ये सरिता हरवल्याची तक्रार केली. त्यानंतर थोड्या वेळानं पोलीस वाड्यात येतात. डेडबाॅडी मिळाल्याची बातमी देतात. दत्ता तर हंबरडाच फोडतो. अर्थात, सरिता जिवंतच असणार, हे प्रेक्षकांनाही माहीत आहे. कारण गेल्या भागात सरिता होती.

तरीही सरिताचा शोध काही थांबत नाही. सरिताही घरातून हकलवल्यावर अनेक ठिकाणी भटकत राहते. ती माहेरी येते. आई-वडिलांना भेटते. ती शेवंताकडेही जाते. पण एका जागी थांबत नाही. तिचा अपमान, दु:ख तिच्या जिव्हारी लागलंय.

दरम्यान,सरिता आक्रमक झाली होती. तिला वच्छी आणि तिच्या सूनेचं खरं रूप कळल्यावर सरिता भडकते. वच्छीच्या सुनेला तर ती घाबरवताना रंगे हाथ पकडते. तिच्या कानाखाली देते.

दुसऱ्या दिवशी अण्णांच्या घरासमोर काळी बाहुली पडलेली असते. ती वच्छीनंच टाकलीय, हे कळल्यावर सरिता वच्छीच्या घरी जाऊन त्या सगळ्यांनाच सुनावते. आमच्या घराकडे पाहिलंत तर डोळे फोडून हातात देईन, असंही सुनावते. याचा परिणाम लगेच होतो. वच्छी या अपमानाचा बदला घ्यायला सरसावते.

Loading...

ती वाड्यावर येऊन सगळ्यांसमोर सरिताला तू नेहमी आमच्या घरी येतेस. आता का नाही आलीस? असं विचारते. आणि साळसुदपणे निघून जाते. छायाचा आधीच सरितावर राग असतो. ती तिला देवघरात घेऊन येते आणि देवाच्या नारळावर हात ठेवायला सांगते. खरं काय ते बोल सांगते. तशी सरिता सर्व गोष्टी खऱ्या सांगून टाकते आणि म्हणून तिला घराबाहेर काढलं जातं.भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 07:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...