रात्रीस खेळ चाले : काशी आणि अण्णा येणार समोरासमोर आणि मग....

इकडे काशीचा वेडेपणा वाढत चाललाय. मी अण्णा नाईक, हे वेड काही त्याच्या मनातून जात नाहीय.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 08:16 PM IST

रात्रीस खेळ चाले : काशी आणि अण्णा येणार समोरासमोर आणि मग....

मुंबई, 22 एप्रिल : रात्रीस खेळ चाले मालिकेत आता बऱ्याच घटना घडतायत. अण्णांनी सरिताला घरी आणलं. घरच्यांच्या नजरेसमोर अण्णा एकदम ग्रेट ठरले. अर्थात, सरिताला अण्णा शेवंताकडे जातात, हे कळलं. पण ती तोंड उघडत नाहीय. अण्णांनाही हेच हवंय.

इकडे काशीचा वेडेपणा वाढत चाललाय. मी अण्णा नाईक, हे वेड काही त्याच्या मनातून जात नाहीय. त्यात पांडू शेवंताचं नाव त्याच्या समोर घेतो आणि काशी शेवंताला शोधत तिच्या घरी येतो. तिथे आधीच अण्णा बसलेत. काशी खिडकीतून वाकून बघत असतो. अशात अण्णाही काशीला पाहणार. आणि मग घडणार एक वेगळंच नाट्य. काशीच्या वेडेपणाचा फायदा घेऊन अण्णा काशीलाच संपवणार.

अण्णांना नाना म्हणजे त्यांचे वडीलच राक्षस म्हणतायत. अण्णांना दिवसा-उजेडी भूतं दिसतात. पण ती त्यांनाच दिसतात. इथेही मालिकेनं आपण अंधश्रद्धा पसरवत नाही, ही भूमिका घेतलीय. कारण अण्णांनी ज्यांचा खून केला, ती माणसं त्यांना दिसतात. भवरी, नोकर हे फक्त त्यांनाच दिसतात. कारण ते त्यांच्या मनातलं गिल्ट. मनातली भीती अशी समोर दिसतेय.

तरीही अण्णा काही सुधारणार नाहीत. जेव्हा ते कोणाला ठार मारतात, तेव्हा आंब्याचं कलम लावतात. आता पुढच्या काही एपिसोडमध्ये अण्णा अशी तीन कलमं लावणार आहेत. म्हणजे तिघांचा खून अण्णा करणार.

अण्णा सरिताला घेऊन घरी येतात. दत्ता सरिताला पाहून इमोशनल होतो. अण्णा आपल्या खोलीत जातात आणि रात्रीच्या काळोखात त्यांना दिसते भवरी. अण्णा दचकतात. भवरी त्यांच्याकडे एका गोष्टीचा जाब मागते.SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकरांची पार्थ पवारांवर जहरी टीका, म्हणाले...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2019 08:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close