रात्रीस खेळ चाले : अण्णा अजून लावणार आंब्याची तीन कलमं

रात्रीस खेळ चाले : अण्णा अजून लावणार आंब्याची तीन कलमं

अण्णा काही सुधारणार नाहीत. जेव्हा ते कोणाला ठार मारतात, तेव्हा आंब्याचं कलम लावतात. आता पुढच्या काही एपिसोडमध्ये अण्णा अशी तीन कलमं लावणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 04 एप्रिल : रात्रीस खेळ चाले मालिकेत रोजच बरंच काही घडत असतं. सध्या वच्छी आणि तिची सून अण्णांची सून सरिताला गोड बोलून स्वत:कडे वळवतायत. अण्णांना मारण्यासाठी त्या सरिताचा वापर करतायत. सरिता मात्र भोळी आहे. नाईकांची सून म्हणून वाड्याचं चांगलं व्हावं यासाठी काहीही करायला तयार आहे. ती वारंवार वच्छीच्या घरी जातेय. ती म्हणेल त्यावर तिचा विश्वास बसतोय.

अण्णांना नाना म्हणजे त्यांचे वडीलच राक्षस म्हणतायत. अण्णांना दिवसा-उजेडी भूतं दिसतात. पण ती त्यांनाच दिसतात. इथेही मालिकेनं आपण अंधश्रद्धा पसरवत नाही, ही भूमिका घेतलीय. कारण अण्णांनी ज्यांचा खून केला, ती माणसं त्यांना दिसतात. भवरी, नोकर हे फक्त त्यांनाच दिसतात. कारण ते त्यांच्या मनातलं गिल्ट. मनातली भीती अशी समोर दिसतेय.

तरीही अण्णा काही सुधारणार नाहीत. जेव्हा ते कोणाला ठार मारतात, तेव्हा आंब्याचं कलम लावतात. आता पुढच्या काही एपिसोडमध्ये अण्णा अशी तीन कलमं लावणार आहेत. म्हणजे तिघांचा खून अण्णा करणार.

या तिघांमध्ये वच्छी, वच्छीचा मुलगा काशी आणि शेवंताचा नवरा पाटणकर हे तिघं अण्णांच्या बंदुकीचे बळी पडणार आहेत. रात्रीस खेळ चाले ही आणखी रंजक होत जाणार आहेत.

‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील अण्णा नाईक या व्यक्तिरेखेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेते माधव अभ्यंकर हे अण्णांची भूमिका साकारत आहेत. पहिल्या सीझनमध्ये माधव अभ्यंकर यांची भूमिका छोटी होती. पहिल्या भागामध्ये अण्णांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यांना मोजकेच संवाद होते. पण दुसऱ्या सीझनमध्ये त्यांची भूमिका मध्यवर्ती असल्याने पूर्णपणे मालवणी भाषेत बोलावं लागेल, असं निर्माता-दिग्दर्शकांनी त्यांना आधीच सांगून टाकलं.

माधव अभ्यंकर म्हणाले, माझी मालवणी भाषा सोपी करण्यात अभिनेता लीलाधर कांबळी यांचे मनापासून आभार मानतो. त्यांचे मालवणी भाषेतील संवाद सहज आणि स्वच्छ तसेच कुणालाही समजतील, असे असतात.

First published: April 4, 2019, 6:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading