अण्णांच्या 'या' एका निर्णयानं घरातल्यांना बसतो जबरदस्त धक्का

अण्णांच्या 'या' एका निर्णयानं घरातल्यांना बसतो जबरदस्त धक्का

Ratris Khel Chale - रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा एक महत्त्वाचा निर्णय घेतात

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : रात्रीस खेळ चाले मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. अण्णांनी वच्छीवर बंदूक चालवली आणि शोभा मध्ये आली. तिला गोळी लागली. अण्णा तुरुंगात गेले. पण अण्णांच्या बाजूनं शोभानं साक्ष दिली. शोभानं सांगितलं, गोळी चुकून लागली. त्यामुळे अण्णा तुरुंगातून बाहेर पडले.

इकडे वच्छी सुनेवर भडकलीय. सुनेनं-शोभानं अण्णांच्या बाजूनं साक्ष दिली म्हणून तिला भयंकर राग आलाय. ती तिला घराबाहेर काढण्याचंही ठरवते. पण शेवटी तिचं मन बदलतं.

प्रियांका चोप्रा म्हणते, मला आई व्हायचंय, पण...

शोभा पुन्हा वाड्यात येते. ती अण्णांच्या समोर येते. त्यामुळे माई चिंतेत पडतात. सरिताला तर शोभा पुन्हा वाड्यावर नकोच असते. पण अण्णा तिला वाड्यात काम करायला ये, म्हणून सांगतात. त्यांच्या या निर्णयानं सगळ्यांना धक्का बसतो. आता पुढच्या काही भागांमध्ये शोभा वाड्यात अगदी मोकळेपणानं काम करणार. मुद्दाम अण्णांच्या पुढे पुढे करणार आणि वाड्यातल्या काही वस्तूही चोरणं, सुरू ठेवणार.

अखेर सलमान खाननं केली 'दिल की बात', कतरिनाला म्हणाला...

शेवंताला अण्णांनी गर्भपाताचं औषध दिल्यानं तिच्यावर परिणाम झाला. ती कुरूप दिसायला लागली. पण पाटणकरांनी तिची सेवा केली. आता शेवंताचं रूप सुधारलंय. तिला आपल्या नवऱ्याचं महत्त्व कळलंय. ती आता नवऱ्याला महत्त्व द्यायला लागलीय.

लग्नाच्या 8 वर्षानंतर इम्रान खान घेणार घटस्फोट? पत्नीनं शेअर केली इमोशनल पोस्ट

या मालिकेत अण्णांची भूमिका करणाऱ्या माधव अभ्यंकरांचं खूप कौतुक होतंय. अण्णांचा क्रूरपणा, लहरीपणा त्यांनी अगदी योग्य पद्धतीनं उभा केलाय. शेवंताची भूमिका करणारी अपूर्वा नेमाळेनं एकदम ठसकेबाज भूमिका साकारलीय. या मालिकेतली सर्वच पात्र अगदी खऱ्याखुऱ्या व्यक्तिरेखा वाटाव्यात अशा आहेत. मालिकेचा मालवणी लहेजा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

लाडक्या रॅम्बोला भेटायला पोहोचले राज ठाकरे, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 06:34 PM IST

ताज्या बातम्या