मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'क्यूटीपाय’ ते 'ढोलिड़ा' पर्यंत! रणबीर-आलियाच्या लग्नात सासूबाई नीतू कपूरचे जोरदार ठुमके; पाहा VIDEO

'क्यूटीपाय’ ते 'ढोलिड़ा' पर्यंत! रणबीर-आलियाच्या लग्नात सासूबाई नीतू कपूरचे जोरदार ठुमके; पाहा VIDEO

बॉलीवूडमधलं स्टार कपल रणबीर कपूर-आलिया भट्ट नुकतेच विवाहबद्ध (Alia Ranbir Wedding) झाले. त्यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो तर प्रचंड व्हायरल झालेच. पण त्यानंतर आता रणबीर आलियाच्या मेंदी आणि संगीत कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओजही खूप व्हायरल होत आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 16 एप्रिल : बॉलीवूडमधलं स्टार कपल रणबीर कपूर-आलिया भट्ट नुकतेच विवाहबद्ध (Alia Ranbir Wedding) झाले. त्यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो तर प्रचंड व्हायरल झालेच. पण त्यानंतर आता रणबीर आलियाच्या मेंदी आणि संगीत कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओजही खूप व्हायरल होत आहेत. फॅन्स तर या फोटो आणि व्हिडिओजवर जाम खूश आहेत. कपूर कुटुंबातलं बाँडिंग तर यामुळे पुन्हा समोर आलं आहेच. पण सगळ्यांत लक्ष वेधून घेतलं ते वरमाई म्हणजेच रणबीरची आई नीतू कपूरनं. तिच्या डान्सच्या प्रॅक्टिसचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. तेही चाहत्यांना जाम आवडवलेत. नीतू कपूरनं आपल्या मुलाच्या लग्नात मुलगा आणि सुनेच्या चित्रपटांतील हिट गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावलेत.

सोशल मीडियावर (Social Media) आलिया-रणबीरच्या लग्नाचे (Alia Ranbir Wedding) आणि त्याआधीच्या फंक्शन्सचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत. यामध्ये नीतू कपूर संगीत कार्यक्रमाची (Sangeet Ceremony) प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ (Neetu Kapoor Dance Video) आहे. या रिहर्सलदरम्यान नीतू सिंग मस्त ठुमके लगावताना दिसत आहे.

सोशल मीडियावर एका फॅन पेजवर नीतू कपूरच्या डान्सचे तीन व्हिडिओज (Neetu Kapoor Dance Video) शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओत नीतू तिची सून आलिया भट्टचा चित्रपट ’गंगूबाई काठियावाडी’ (GAngubai Kathiyawadi), रणबीरच्या चित्रपटातील गाणं ‘क्युटीपाय (Cutipie)’ आणि तिसऱ्या व्हिडिओत ती ‘मेहेंदी है रचने वाली’ वर मास्टरजींसोबत रिहर्सल करताना दिसत आहे. त्याशिवाय फिल्मफेअरनंही त्यांच्या पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती रणबीरच्या ‘ये जवानी ये दीवानी’ मधलं हिट गाणं ‘घागरा’ वर नाचण्याची रिहर्सल करताना दिसत नीतू कपूर दिसत आहे.

हे ही वाचा-'ये रिश्ता क्या केहेलाता है' फेम अभिनेत्री बनली आई, घरी आला छोटा पाहुणा

आलिया-रणबीरचं लग्न (Alia Ranbir Wedding) थाटात व्हावं अशी रणबीरचे वडील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची इच्छा होती. एक-दीड वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. पण नीतू कपूरनं त्यांचं स्वप्न पूर्ण करत हे लग्न अगदी थाटातपण जवळच्या नातेवाईक मित्रपरिवाराच्या साक्षीने पार पाडलं. या लग्नासाठी नीतू कपूरनं भरपूर तयारीही केली होती आणि लग्नात तिनं भरपूर मस्तीही केलेली या व्हिडिओजवरून दिसत आहे.

13 एप्रिल रोजी विशेष पूजा आणि मेंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर नीतू कपूरनं आलिया आणि रणबीरचं लग्न 14 एप्रिल रोजी होणार असल्याचं पत्रकारांना सांगितलं होतं. पंजाबी रीतीरिवाजानुसार हे दोन्ही स्टार्स संध्याकाळी 7.45 वाजता विवाहबद्ध झाले. या सोहळ्यातील एकामागोमाग एक फोटो, व्हिडिओजची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Dance video, Ranbir kapoor