मिसेस मुख्यमंत्री : लग्नात सुमीनं समरला दिलं 'हे' सरप्राइझ गिफ्ट
Mrs Mukhyamantri - समर-सुमीचा लग्नसोहळा रंगणार दिमाखदारपणे. पाहा Photos

काउंट डाउन सुरू झालंय. समर-सुमीच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे.

ताई मॅडमना सुमी अजिबात पसंत नाही. पण तिच्यामुळे समर मुख्यमंत्री होणार, असं भविष्य ज्योतिषानं वर्तवल्यानंतर त्यांनी सुमीचा स्वीकार केला.

आता समर आणि सुमीचं लग्न दणक्यात होणार. ताई मॅडमचे सुमीविरोधातले सगळे डावपेच सुमीनं हाणून पाडले.

लगनाच्या वेळी सुमी आणि समर एकमेकांना सरप्राइझ गिफ्ट देणार आहेत.

हे गिफ्ट म्हणजे समर सुमीला खेळण्यातली सायकल आणि सुमी समरला खेळण्यातलं विमानतळ भेट म्हणून देणार आहे.

हा लग्नसोहळा पार पडेल आणि सुमी-समरचं वेगळं आयुष्य सुरू होईल. सुमी आता मिरवत कोणाला जिरवणार हे पाहायचं.

मिसेस मुख्यमंत्री ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या पाचात सतत आहे. तिच्या बरोबर सुरू झालेल्या मालिकांना अजून ते स्थान पटकवता आलेलं नाही.
Tags:
First Published: Sep 19, 2019 07:15 PM IST