माझ्या नवऱ्याची बायको : शनाया निघाली परदेशात पण...

माझ्या नवऱ्याची बायको : शनाया निघाली परदेशात पण...

पैसे घेऊन शनाया आणि तिची आई परदेशात पळून जाण्याचा प्लॅन करतात. तशी सगळी सोय करून ठेवतात.

  • Share this:

मुंबई, 11 मे : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत राधिकाचे 35 कोटी गुरूनं चोरलेत. राधिका आणि तिच्या राधिका अँड मसाले कंपनीवर मोठं संकट कोसळलंय. या पैशांवर शनाया आणि तिच्या आईचा डोळा आहे. केडीनं पैशाची बॅग लपवून ठेवली असली तरीही शनाया आणि तिची आई ती शोधून काढतातच.

हे पैसे घेऊन त्या परदेशात पळून जाण्याचा प्लॅन करतात. तशी सगळी सोय करून ठेवतात. त्यांचा जाण्याचा दिवसही उजाडतो. पैशाची बॅग घेऊन त्या टॅक्सीत बसतात आणि मालिकेतला योगायोग समोर येतो. ती टॅक्सी चालवत असतो गुरू. त्यामुळे शनायाच्या प्लॅनवर पाणी पडतं. पैसे घेऊन त्यांना पुन्हा परत यावं लागतं.

'IPL 12'च्या शेवटच्या मॅच अगोदर सलमान-कतरीना करणार 'हे' मोठं काम

येत्या काही दिवसात या मालिकेत असं नाट्य पाहायला मिळणार आहे. राधिकाच्या घरातले तर तिच्या बाजूनंच उभे राहतायत. गुरू सगळं करून नामानिराळा राहिलाय. त्याच्या वडिलांनाच त्याच्यावर संशय आलाय. ते त्याला थोबाडीत मारून तूच पैसे चोरले असंही ते म्हणतात. गुरूनं पैशाची बॅग केडीच्या घरी पोचवलीय. आपल्यावर संशय येऊ नये असा तो वागतोय.

Sacred Games 2चं नवं पोस्टर काय सांगतं , गणेश गायतोंडेची पुन्हा दहशत ?

शनाया, राधिका, गुरू या व्यक्तिरेखांचा निर्माता आहे अभिजीत गुरू. तो  ही मालिका लिहितोय. अभिजीत म्हणाला, 'सुरुवातीला झी मराठीनं आम्हाला संकल्पना सांगितली होती. पती,पत्नी और वो. या विषयावर बरेच सिनेमे आलेत, गेला माधव कुणीकडेसारखी नाटकं आलीयत. पण आम्हाला ही मालिका इमोशनल करायची नव्हती. एन्टरटेनिंग करायची होती.'

लग्नाआधीच गरोदर राहिली अक्षय कुमारची 'हिरोईन'

अभिजीत पुढे म्हणाला, ' पुरुषाची एक जात असते. बायको कितीही छान असली तरी काही दिवसांनी त्याला ती रुटिन वाटू शकते. त्याला स्पाइस हवा असतो. असे पुरुष बरेच असतात. तेच आम्ही मालिकेत आणलंय.'

SPECIAL REPORT: तो दिवस माझ्यासाठी खास... प्रिया बेर्डेनं सांगितला 'अभिनय'चा हा किस्सा

First published: May 11, 2019, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading