माझ्या नवऱ्याची बायको : ...म्हणून राधिकालाही हवा आहे सौमित्र

माझ्या नवऱ्याची बायको : ...म्हणून राधिकालाही हवा आहे सौमित्र

सौमित्रच्या मनात राधिकाबद्दल प्रेम असल्याचं गुरूला कळतं आणि तो मुद्दाम राधिकासमोर ते उघड करतो.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत राधिका, गुरू आणि शनाया या त्रिकुटात चौथा कोनही आला होता. तो म्हणजे सौमित्र. सौमित्रच्या मनात राधिकाबद्दल प्रेम असल्याचं गुरूला कळतं आणि तो मुद्दाम राधिकासमोर ते उघड करतो. राधिका भडकते. आपल्याला गुरूच्याच रांगेत नेऊन बसवलं असं सगळ्यांना सांगते.

राधिकाला सौमित्रची मैत्री हवी असते. पण झाल्या प्रकारामुळे सौमित्रलाही कसं तरी वाटत असतं. तो इथला निरोप घेऊन अमेरिकेला जायला निघतो. पण त्याआधी तो राधिकाला भेटायला जातो आणि सगळं चित्र साफ होतं. राधिकाला सौमित्र मित्र म्हणून हवाच आहे. त्यांच्या मैत्रीवर ती पाणी सोडायला तयार नाही. समजूतदार सौमित्रही आपल्या मनातलं राधिकाबद्दलचं प्रेम तसंच ठेवतो आणि मैत्रीचं नातं जपतो.

याआधी राधिका आणि सौमित्र एका हाॅटेलमध्ये भेटतात. त्यांच्या समोर वेटर एक केक घेऊन येतो. त्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं असते. हे वाचून राधिका सौमित्रवर खूप चिडते आणि निघून जाते. तितक्यात गुरू येतो आणि हा केक मी पाठवला होता असं सांगतो. हा माझाच प्लॅन होता म्हणून गुरू राधिका आणि सौमित्रला सर्व सांगतो. हे ऐकून राधिका रडत रडत निघून जाते. सौमित्र खूप हर्ट होतो आणि सौमित्रही निघून जातो.

शनाया आणि गुरूचं प्रेमप्रकरण सुरू आहेच. शनायाच्या आईला राधिकाची संपत्ती हवी असते. गुरूही त्याच्याच मागे असतो.

डेली एपिसोड लिहिणं म्हणजे एक कारखानाच असतो. अनेक गोष्टी लेखकाच्या हातात नसतात. मालिकेचा लेखक अभिजीत गुरू सांगत होता, सुरुवातीला राधिका, तिचा भाऊ आणि वहिनी यांचा इमोशनल ट्रॅक दाखवला होता. पण त्यावेळी आमचं रेटिंग पडलं. प्रेक्षकांना शनाया, गुरू आणि राधिका यांच्या मध्ये कुणीच येऊ नये असं वाटतं. मग आम्ही भावाचा ट्रॅक घेतला नाही पुन्हा.

राधिका 300 कोटींची मालकीण यावर बरीच टीका होते. अभिजीतचं म्हणणं असं की, असे अनेक मसालेवाले आहेत ज्यांची वार्षिक उलाढाल याहूनही जास्त आहे. मग राधिकाची का नाही? पुन्हा एवढी टीका होतेय, याचा अर्थ प्रत्येक एपिसोड पाहतायत. ही खूप चांगली गोष्ट नाही का?'

VIDEO :...म्हणून पार्थला दिल्लीत पाठवा, अजित पवारांचा तरुणांना मिश्किल सल्ला

First published: April 13, 2019, 7:12 PM IST

ताज्या बातम्या