माझ्या नवऱ्याची बायको : अखेर राधिका सौमित्रला लग्नासाठी देते होकार पण...

माझ्या नवऱ्याची बायको : अखेर राधिका सौमित्रला लग्नासाठी देते होकार पण...

Mazya Navryachi Bayako - मालिकेत राधिका आणि सौमित्रमधले बंध आणखी घट्ट होतायत. लवकरच एक वळण येणार आहे

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : माझ्या नवऱ्याची बायको मालिका सुरू होऊन बरीच वर्ष झाली. या मालिकेनंतर सुरू झालेल्या मालिका सुरू झाल्या आणि संपल्या. तरीही ही मालिका अजून टीआरपी रेटिंगमध्ये नंबर 1 किंवा नंबर 2 वर असते. आता या मालिकेत आणखीन एक टर्न येणार आहे.

सध्या राधिका आणि सौमित्र सारखे एकत्र असतात. सौमित्रचं राधिकेवर प्रेम आहे. तो तिची काळजी घेतोय. सगळ्यांना म्हणजे अगदी गुरूच्या आई-वडिलांना वाटतं की सौमित्र आणि राधिकानं लग्न करावं. सुरुवातीला राधिका याला तयार नसतेच. पण आता मालिकेत मोठं वळण येणार. ते म्हणजे राधिका सौमित्रला लग्नासाठी होकार देते.

खलनायक हूँ मैं... SAAHO च्या सर्व व्हिलन्सचे लुक रिलीज, पाहा फोटो

लग्नाची वेळही ठरते. पण हे लग्न थांबण्याची शक्यता वाढते ती गुरूमुळे. सध्या गुरू एकटाच राहतोय. शनाया पोपटरावाबरोबर आहे. राधिकानं सौमित्रशी लग्न करू नये अशी गुरूची इच्छा असते.

…म्हणून 2019मध्ये रिलीज होऊनही ‘उरी’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

VIDEO : रवीनासोबत रोमँटिक गाण्यावर डान्स करत होता गोविंदा आणि...

काही महिन्यांपूर्वी गुरू जेव्हा राधिकासोबत घरी रहात होता तेव्हा त्यानं मुद्दाम एक प्लॅन केलेला असतो. राधिका आणि सौमित्र एका हाॅटेलमध्ये भेटतात. त्यांच्या समोर वेटर एक केक घेऊन येतो. त्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं असते. हे वाचून राधिका सौमित्रवर खूप चिडते आणि निघून जाते. तितक्यात गुरू येतो आणि हा केक मी पाठवला होता असं सांगतो. हा माझाच प्लॅन होता म्हणून गुरू राधिका आणि सौमित्रला सर्व सांगतो. हे ऐकून राधिका रडत रडत निघून जाते. सौमित्र खूप हर्ट होतो आणि सौमित्रही निघून जातो. ही घटना जुनीच, पण आता बदल झालेत. सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन राधिका सौमित्रला होकार देते.

घर की तलाव कळेना, कोल्हापुरातल्या गावातील पुराची भीषणता दाखवणारा ग्राऊंड REPORT

First published: August 10, 2019, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading