गुरूला झाला पश्चात्ताप, राधिकाची मागणार माफी, तरीही मालिकेत अजून एक ट्विस्ट

गुरूला झाला पश्चात्ताप, राधिकाची मागणार माफी, तरीही मालिकेत अजून एक ट्विस्ट

आईच्या दबावाखाली येऊन शनायानं गुरूला सोडलं. त्यामुळे गुरू सैरभैर झाला. घरातले आता आपल्याशी पूर्वीसारखे वागत नाहीत, याची जाणीव त्याला झाली. आपल्या वागण्याचा त्याला पश्चात्तापही झालाय.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत दर आठवड्यालाच काही ना काही वळणं येत असतात. काही दिवसांपूर्वी गुरूनं झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि आता तो हाॅस्पिटलमध्ये भर्ती आहे. पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

आईच्या दबावाखाली येऊन शनायानं गुरूला सोडलं. त्यामुळे गुरू सैरभैर झाला. घरातले आता आपल्याशी पूर्वीसारखे वागत नाहीत, याची जाणीव त्याला झाली. आपल्या वागण्याचा त्याला पश्चात्तापही झालाय.

हाॅस्पिटलमध्ये गुरूनं राधिकाची क्षमा मागितली. त्याला आता पूर्वीसारखा संसार करायची इच्छा आहे. राधिकाच्या मनातही गुरूबद्दल साॅफ्ट काॅर्नर आहेच. शनायाच्या आईला मात्र वाटतंय की गुरू हे सर्व नाटक करतोय. ती गुरूला भेटायला येते आणि राधिकाची संपत्ती हडप करण्याचा हा चांगला मार्ग आहे हेही सांगते. पण गुरू तिच्या अंगावर ओरडतो. तिला हाकलून देतो.

इकडे शनाया मात्र आईच्या विरोधात जाणार. केडीला सोबत घेऊन ती पुन्हा एकदा गुरूकडे येणार. आता गुरू सुधारलेला दाखवला तर मालिकाच संपून जाईल. त्यामुळे गुरूला जरी पश्चात्ताप झालेला दाखवला असेल तरी शनाया काही त्याचा पिच्छा सोडत नाही. त्यामुळे या मालिकेत अजून बऱ्याच उलथापालथी होणार आहेत.

शनायाची निर्मिती कशी झाली, याबद्दल लेखक अभिजीत गुरू खूप इंटरेस्टिंग सांगत होता. तो म्हणाला, 'शनायासारख्या मुली बऱ्याचदा काॅर्पोरेटमध्ये दिसतात. त्या खूप बालिश असतात. सेल्फी काढणं, नेलपेंट लावणं यातच रमतात. अशा मुली नेहमीच कुठेतरी बघितल्यासारख्या वाटतात. ' अभिजीतनं शनाया यातूनच तयार केली.

शनायाचा राग येत नाही कधी, यावर अभिजीत म्हणतो, ' ती दुष्ट, कनिंग बनणार नाही, याची आम्ही काळजी घेतलीय. ती मूर्ख आहे, पण दुष्ट नाही.'

शनायाची भूमिका अगोदर रसिका करत होती, आता ईशा करते. हा बदल होताना व्यक्तिरेखेतही काही बदल करावे लागले का? अभिजीत गुरू सांगतो, ' रसिकानं मालिका सोडायचा निर्णय अचानक घेतला. त्यामुळे शनायासाठी अभिनेत्री मिळत नव्हती. पण ईशानं ते चांगलं पेललं. सुरुवातीला ती विचारून करायची.'अभिजीत म्हणतो, व्यक्तिरेखा ही नेहमीच कलाकारांपेक्षा मोठी असते.

VIDEO: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला किल्ले शिवनेरी

First published: March 23, 2019, 11:44 AM IST

ताज्या बातम्या