...म्हणून राधिका आणि शनायानं केली मैत्री

...म्हणून राधिका आणि शनायानं केली मैत्री

Mazya Navryachi Bayako, Shanaya - सतत टीआरपीमध्ये नंबर वनवर असलेली मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'. या आठवड्यात या मालिकेत प्रेक्षकांना धक्का बसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जून : सतत टीआरपीमध्ये नंबर वनवर असलेली मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'. सध्या यात गुरू आपल्याला काहीही आठवत नसल्याचं नाटक करतोय. या आठवड्यात बऱ्याच धक्कादायक घटना घडणार आहेत. गुरूचं खोटेपणाचं बिंग फोडण्यासाठी पुन्हा एकदा राधिका आणि शनाया एकत्र येणार आहेत. तो या आठवड्यात टर्निंग पाॅइंट ठरणार आहे.

गुरूचं नाटक सर्वांसमोर आणण्यासाठी राधिका गुरूच्या उश्याखाली रेकॉर्डर लावून ठेवते. गुरूला परत सगळं आठवून देण्यासाठी सुलक्षणा आणि शनाया प्लॅन करतात. शनाया मंदिरात डब्यातून लाडू चोरते. राधिका शनायाला लाडू चोरताना बघते. राधिका देवळाच्या मागे जाऊन शनायाला पकडते. शनाया टेन्शनमध्ये येते.

'हा' पाहा राणादाचा मेकओव्हर, मालिकेत आता दाक्षिणात्य तडका

इतका किराणा घरात कसा आला म्हणून केडी विचारात पडतो. मंदिरात घडलेलं सर्व शनाया सुलक्षणाला सांगते. सुलक्षणा गुरूला धडा शिकवण्यासाठी राधिकाच्या बाजूने राहायचा निर्णय घेते. राधिका शनायाला भेटायला बोलवते आणि आपला प्लॅन सांगते.

करिना कपूरवर आली तलावात आंघोळ करायची वेळ, फोटो व्हायरल

शनाया पिझ्झा हबमध्ये जाते. गुरूही अथर्वला घेऊन जातो. गुरू सुलक्षणाचं बोलणं ऐकण्याचं प्रयत्न करतो. शनाया बाहेर पडते. राधिका लांबून शनायाला सांगत असते. तिच्या मागेमागे गुरुही बाहेर येतो आणि शनायाचा हात पकडतो. शनाया पस्तीस कोटींबद्दल बोलते. हे ऐकून राधिका शॉक होते.

गाडीत बसताना फोटोग्राफर काढत होता दीपिकाचे फोटो, ती म्हणाली, ‘ये आता आत बस...’

शनाया म्हणजेच ईशा केसकरनं नुकतंच इन्स्टाग्रामवर Ask Me Everything द्वारे फॅन्सबरोबर संवाद साधला. पुछ ना असं तिनं इन्स्ट्राग्रामवर टाकलं होतं.यावेळी फॅन्सनी तिला बरेच प्रश्न विचारले. तिची आवडती स्वीट डिश कोणती हा प्रश्न विचारल्यावर तिनं ऋषीचा फोटो टाकत 'हा आणि सगळं स्वीट' असं उत्तर दिलंय.

ईशा आणि ऋषी गेली दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. ईशानं इन्स्ट्रावर  हेही लिहिलं की 29 जुलैला त्यांच्या नात्याला 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यांची भेट कुठे झाली, हाही प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा तिनं उत्तर दिलं, चला हवा येऊ द्या या शोच्या सेटवर. आपण इतक्यात लग्न करणार नसल्याचंही ती म्हणाली.

SPECIAL REPORT: यंदा वारीवर दुष्काळाचं सावट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 08:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading