अखेर 'अशा' प्रकारे गुरूची चोरी पकडली जाते

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत गुरूचे सगळेच प्लॅन्स अयशस्वी होतात.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 08:48 PM IST

अखेर 'अशा' प्रकारे गुरूची चोरी पकडली जाते

मुंबई, 22 मे : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत गुरूचे सगळेच प्लॅन्स अयशस्वी होतात. राधिकाला पदावरून दूर सारून त्याला सीईओ व्हायचं असतं. ते स्वप्न धुळीला मिळालं. म्हणून गुरू आता 35 कोटींची बॅग फेकून द्यायचं ठरवतो. त्याला आता विश्वास संपादन करायचाय.

गुरू ती बॅग नदीत फेकून देतो आणि नेमकं ते एक जण पाहतो. तो पोलिसांना कळवतो. पोलीस राधिकाच्या आॅफिसमध्ये त्या इसमाला घेऊन येतात. तिथे तो गुरूला ओळखतो. गुरूचं बिंग फुटतं.

असं समोर आलं अनाजी पंतांचं कारस्थान, हत्तीच्या पायाखाली द्यायचं निघालं फर्मान

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत राधिकाचे 35 कोटी गुरूनं चोरलेत. राधिका आणि तिच्या राधिका अँड मसाले कंपनीवर मोठं संकट कोसळलंय. या पैशांवर शनाया आणि तिच्या आईचा डोळा आहे. केडीनं पैशाची बॅग लपवून ठेवली असली तरीही शनाया आणि तिची आई ती शोधून काढतातच.

'कोण होणार करोडपती?'मध्ये प्रेक्षकांसाठीही आहे 'ही' मोठी संधी

Loading...

हे पैसे घेऊन त्या परदेशात पळून जाण्याचा प्लॅन करतात. तशी सगळी सोय करून ठेवतात. त्यांचा जाण्याचा दिवसही उजाडतो. पैशाची बॅग घेऊन त्या टॅक्सीत बसतात आणि मालिकेतला योगायोग समोर येतो. ती टॅक्सी चालवत असतो गुरू. त्यामुळे शनायाच्या प्लॅनवर पाणी पडतं. पैसे घेऊन त्यांना पुन्हा परत यावं लागतं.

बिग बी अमिताभ यांच्याबरोबर 'AB आणि CD' गिरवताना दिसणार 'हा' मराठमोळा हिरो

शनाया, राधिका, गुरू या व्यक्तिरेखांचा निर्माता आहे अभिजीत गुरू. तो  ही मालिका लिहितोय. अभिजीत म्हणाला, 'सुरुवातीला झी मराठीनं आम्हाला संकल्पना सांगितली होती. पती,पत्नी और वो. या विषयावर बरेच सिनेमे आलेत, गेला माधव कुणीकडेसारखी नाटकं आलीयत. पण आम्हाला ही मालिका इमोशनल करायची नव्हती. एन्टरटेनिंग करायची होती.'


VIDEO : पुणे तिथे काय उणे, अचूक निकाल सांगा अन् मोफत मिसळ खा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 08:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...