राधिका आणि सौमित्रमध्ये का रे दुरावा?

राधिका आणि सौमित्रमध्ये का रे दुरावा?

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये राधिकासाठी सौमित्र काहीही करायला तयार असतो. पण राधिका त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत गुरू चांगलं वागण्याचं नाटक करतोय. राधिकानं मात्र त्याला पुरून उरण्याचं ठरवलंय. गुरूला राधिकाची कंपनी हडप करायचीय. त्यासाठी तो आॅफिसमध्ये पुन्हा येतो आणि हेच इतर सहकाऱ्यांना आवडत नाही.

राधिकासाठी सौमित्र काहीही करायला तयार असतो. पण राधिका त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते. राधिकाला भेटण्यासाठी सौमित्र मेसेज करतो. परंतु राधिका मेसेजला रिप्लाय करत नाही. राधिका ऑफिसमध्ये येते आणि २५ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या हवाली करणार असं म्हणताच गुरू आश्चर्याने बघतो.

सौमित्र खूप फ्रस्ट्रेट होतो. राधिका आज तुला भेटायला येणार नाही, असं आनंद सौमित्रला फोन करून सांगतो. आणि हे गुरू चोरून ऐकतो. गुरू आनंदला सांगतो की, सौमित्रसारखा साथीदार राधिकाला मिळणार नाही. तिच्या आयुष्यात आता सौमित्रने यावं. हे ऐकून आनंद शॉक होतो.

इकडे सौमित्रसोबत तू नीट वागत नाही आहेस. तू कशी चुकत आहेस हे राधिकाला रेवती सांगते आणि निघून जाते. हे ऐकून राधिका विचारात पडते. राधिकाच्या कॅरिडोरसमोर बुके ठेवलेला असतो. त्यावर लिहिलेली चिठ्ठी वाचून राधिका टेन्शनमध्ये येते. मागे गुरू उभा राहून बघतो. राधिका सौमित्रला भेटायला जाते. गुरुपण तिच्या मागोमाग निघतो.

शनाया बुके बघण्यासाठी राधिकाच्या बेडरूममध्ये जाऊन बुकेचा फोटो काढते. बुकेवर दिलेल्या नंबरवर फोन करून विचारते. गुरुनाथ सुभेदार यांनी दोन बुके बुक केले असं माहिती होताच शनाया गुरूवर चिडते.

राधिका आणि सौमित्र एका हाॅटेलमध्ये भेटतात. त्यांच्या समोर वेटर एक केक घेऊन येतो. त्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं असते. हे वाचून राधिका सौमित्रवर खूप चिडते आणि निघून जाते. तितक्यात गुरू येतो आणि हा केक मी पाठवला होता असं सांगतो. हा माझाच प्लॅन होता म्हणून गुरू राधिका आणि सौमित्रला सर्व सांगतो. हे ऐकून राधिका रडत रडत निघून जाते. सौमित्र खूप हर्ट होतो आणि सौमित्रही निघून जातो.

एकूणच 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत आता खूपच गुंतागुंत निर्माण केली जातेय. प्रेक्षक मात्र त्यात आणखी रमतायत.

VIDEO: अखेर चार तासानंतर बिबट्याचं पिल्लू जेरबंद

First published: April 1, 2019, 5:35 PM IST

ताज्या बातम्या