VIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र

VIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र

Shanaya, Isha Keskar - आजी-माजी शनाया म्हणजे रसिका आणि ईशा गर्लफ्रेंड सिनेमात एकत्र येतायत. या सिनेमाचं गोड गाणं रिलीज झालंय.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतली अगोदरची शनाया म्हणजेच रसिका सुनील आणि आताची शनाया म्हणजे ईशा केसकर दोघीही खूप लोकप्रिय झाल्या. रसिकाची छाप असतानाच ईशानंही मालिकेत आपला चांगलाच जम बसवलाय. आता या दोघीही एकत्र येतायत 'गर्लफ्रेंड' सिनेमात. या सिनेमाचं नवं गाणं आजच ( 15 जुलै ) रिलीज झालं. ईशा आणि रसिका दोघीही इन्स्टाग्रामवर आपल्या या 'गर्लफ्रेंड'चं जोरदार प्रमोशन करतायत.

सिनेमात अमेय वाघला गर्लफ्रेंड मिळत नाही, म्हणून सगळे त्याला टोमणे मारतायत. आणि अचानक सई ताम्हणकर त्याच्या आयुष्यात येते. रिलीज झालेल्या या गाण्याचे शब्दही छान आहेत. 'कोडे सोपे थोडे अवघड थोडे पडले कारे, जागे होण्याआधी स्वप्न नव्याने घडले कारे'. अमेय आणि सईवर चित्रित झालेलं हे गाणं ईशानं इन्स्टावर टाकलंय.

हृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक

'या' दिवशी अनाजी पंतांना देणार हत्तीच्या पायाखाली, पाहा PHOTOS

रसिका सुनीलनं या सिनेमाच्या शूटवेळचे हाॅट फोटोज् इन्स्टावर पोस्ट केलेत. त्यावर आम्ही किती हाॅट दिसतोय हेही तिनं लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

Damn ! We look hot!!! @ameyzone @pratyanchanarale @isha_keskar @gfmarathifilm

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

रसिका आणि ईशाचे फॅन्सही खूप आहेत. पुन्हा दोघीही एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणीही आहेत. शनायाची भूमिका ईशाकडे गेली तेव्हा रसिकानं तिला सांगितलं होतं की टेक केअर ऑफ माय बेबी.

त्यावेळी ईशा म्हणाली होती, ' मला रसिकाच्या शनायाला धक्का लावायचा नाहीय. पण हे एक आव्हान आहे. त्यात प्रयोग करायला मला आवडेल. लोकांचं काय म्हणणं आहे, त्याप्रमाणे मी बदल करेन.' आणि ईशानं ते करून दाखवलं. आता गर्लफ्रेंडमध्ये दोघींना पाहायची फॅन्सना उत्सकता आहे.

Chandrayaan- 2 असं उभं राहिलं 'चांद्रयान-2', ISROचा Exclusive Video

First published: July 15, 2019, 8:54 PM IST
Tags: shanaya

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading