स्टार प्रवाहवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आपल्या भेटीला येते. मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीचा नात्यांच्या घोळक्यात होणारा आयुष्यातील संघर्ष या मालिकेत दाखवण्यात आला आहे. ती एक उत्तम गृहिणी असून कुटुंबाला इतकं जपून. नं तिच्या मुलांना तिची किमंत असते. नं त्याच्या नवऱ्याला. अशातच नवरा पर स्त्रीच्या प्रेमात पडतो. आणि इथे सुरु होतो अरुंधतीचा आपल्या अस्तित्वासाठी नवा संघर्ष. यावेळी मुलांना अरुंधतीच्या अस्तित्वाची किमंत कळते. आणि बाकी सर्व कुटुंबाप्रमाणे ते लोक तिला या लढाईत साथ देत आहेत. (हे वाचा: VIDEO: अभिनयच नव्हे तर या कलेतही शरद केळकर आहे पारंगत; 10 मिनिटांत बनवला बाप्पा) सध्या मालिकेत अरुंधतीच्या पतीची गर्लफ्रेंड म्हणजेच संजना त्याची सवत म्हणून घरात आली आहे. आणि तिला त्रास देण्यासाठी वेगवगेळ्या मार्गांचा अवलंब करत आहे. सध्या संजना अरुंधतीच्या सासू सासऱ्यांच्या औषधांच्या व इतर सर्व वेळा पाळणाऱ्या विमलला मुद्दाम घराबाहेर काढण्याचा कट करत आहे. हे पाहून अरुंधती तिला चांगलंचं बजावते. आणि परत आई अप्पांना किंवा विमलला त्रास दिल्यास परिणाम खूप वाईट होतील चक्क असा दमच भरते. या निडर अरुंधतीला पाहून प्रेक्षक आनंदी झाले आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment