Elec-widget

प्रेक्षकांना भेटायला पुन्हा एकदा येतेय शीतली, सुरू होतेय 'ही' मालिका

प्रेक्षकांना भेटायला पुन्हा एकदा येतेय शीतली, सुरू होतेय 'ही' मालिका

Sheetali, Lagire Zale ji, Alati Palati - लागीरं झालं जी मालिकेतली शीतली लोकप्रिय होती. आता पुन्हा एकदा ती मालिकेतून भेटायला येतेय.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : काही दिवसांपूर्वी लागीरं झालं जी ही मालिका संपली. त्या वेळी टीआरपी रेटिंगमध्ये संपता संपता ही मालिका नंबर वन झाली होती. अज्या आणि शीतलीचे फॅन्सही खूप होते. अनेकदा मालिका संपते, पण त्यातल्या व्यक्तिरेखा अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून असतात. अगदी आभाळमाया असेल, अवंतिका असेल या मालिकांची आजही आठवण काढली जाते.

आता फॅन्ससाठी खूशखबर आहे. तुम्ही शीतलीला मिस करत असाल, तर ती परत येतेय. हो, शिवानी बावकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील आगामी आलटी पालटी या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत आहे. यात ती एक ठग म्हणून दिसेल.

सुश्मिता सेनला KISS करताना दिसला बॉयफ्रेंड रोहमन, Photo Viral

शिवानी म्हणते की,  'मला अभिनय करायचा आहे मग तो टीव्ही असो किंवा इतर कुठलंही माध्यम. शीतलच्या भूमिकेने मला काम करण्याचं समाधान दिलं आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आता मी जी भूमिका स्वीकारली आहे ती शीतलच्या अगदी विरुद्ध आहे. शूटिंगच्या वेळी मला फार त्रास होत नाही. हा सगळा माहोल आणि काम आवडतंय म्हणूनच मी हे करतेय.'

सुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग

Loading...

लागीरं झालं जी मालिकेत अस्खलित सातारी बोलणारी शीतली ही जर्मन भाषेतसुद्धा पारंगत आहे. शिवानी हिने ११वी पासूनच जर्मन भाषेचे धडे गिरवायला सुरुवात केली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी शिवानी एका आय.टी. फर्ममध्ये जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून काम करत होती.

Sacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा

शिवानीने भरतनाट्यमचे प्रशिक्षण देखील घेतले आहेत. शिवानीला शास्त्रीय नृत्याची आवड असल्यामुळे शिक्षण पूर्ण करत असतानाच तिने भरतनाट्यमच प्रशिक्षण देखील पूर्ण केलं.शिवानीने रुपारेल कॉलेजमधून तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

रुपारेलच्या नाट्य विभागात ती सामील झाली. तिथे ती नाटकात काम करायची. अभिनयाची आवड असल्यामुळे शिवानीने प्रमोद प्रभुलकर यांच्याकडे अभिनयाचे धडे घेतले. शिवानीला गाण्याची देखील आवड आहे. शाळेत असताना शिवानीने गाण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

VIDEO: गडचिरोलीतील मुलींच्या निवासी शाळेचा प्रश्न ऐरणीवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sheetali
First Published: Jul 23, 2019 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...