मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

करण मेहरा आणि निशा रावलच्या भांडणात होतंय मुलाचं हाल; अभिनेत्याने व्यक्त केली खंत

करण मेहरा आणि निशा रावलच्या भांडणात होतंय मुलाचं हाल; अभिनेत्याने व्यक्त केली खंत

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Ye Rishta Kya Kahalata Hai) फेम नैतिक म्हणजेच अभिनेता करण मेहरा(Karan Mehara) आणि पत्नी निशा रावलमध्ये(Nisha Rawal) सध्या जोराचा वाद सुरु आहे

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, ९ सप्टेंबर- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Ye Rishta Kya Kahalata Hai) फेम नैतिक म्हणजेच अभिनेता करण मेहरा(Karan Mehara) आणि पत्नी निशा रावलमध्ये(Nisha Rawal) सध्या जोराचा वाद सुरु आहे. निशाने तर चक्क करणवर मारहाणीचा आरोप केला होता. तसेच मुंबई पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली होती. या सर्व प्रकरणानंतर निशा आणि करण विभक्त राहतात. या दोघांचा एक मुलगासुद्धा आहे. त्याचं नाव काविश असं आहे. आणि तो निशासोबत राहतो. नुकताच करणने मुलाचा एक खास व्हिडीओ शेयर करत. आपल्याला भेटून १०० दिवस झाल्याचं म्हटलं आहे.

आपल्या इन्स्टाग्रामवर मुलाचा जुना व्हिडीओ शेयर करत करणने मुलाला बघण्याची धडपड व्यक्त केली होती.करण मेहराने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला होता. हा व्हिडीओ त्याचा मुलगा काविशचा होता. हा एक जुना व्हिडीओ होता. यामध्ये बापलेकरामधील म्हणजेच करण आणि काविशमधील घट्ट नातं स्पष्ट दिसत होतं. करणने व्हिडीओ शेयर करत म्हटलं आहे,' १०० दिवस तुला मिस करत आहे, माझ्या मुलं'. या व्हिडीओमध्ये करण काविशसोबत खेळताना दिसून येत आहे. यामध्ये काविश खूपच लहान दिसत आहे.

(हे वाचा: अमृताला झाली बाप्पाच्या आगमनाची घाई; शेयर केला मजेशीर VIDEO)

करणचा हा व्हिडीओ त्याच्या कलाकार मित्रांनादेखील पसंत पडत आहे. पोलीस तक्रारीनंतर निशाने एका मुलाखतीमध्ये करणवर आरोप करत म्हटलं होतं, की ‘करणने मला भिंतीवर आपटल आणि मला इजा पोहचवली’. तर दुसरीकडे करणने मुलाखती देत स्पष्ट केल होतं, की ‘निशा खोटं बोलत आहे. तिने मला शिवीगाळ केली. आणि स्वतःचं डोक भिंतीवर आपटून स्वतःला इजा करून घेतली’. या दोघांच्या आरोप-प्रत्यारोपाने सर्वच लोक बुचकळ्यात पडले होते. तसेच मुंबई पोलिसांनी करणला अटकदेखील केली होती. मात्र काही तासांच्या विचारपूसनंतर तिला जामीनवर सोडण्यात आलं होतं.

First published:

Tags: Entertainment