HISTORY TV18वर 'महाकालेश्वर-लीजण्ड ऑफ शिवा'मध्ये इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन

HISTORY TV18वर 'महाकालेश्वर-लीजण्ड ऑफ शिवा'मध्ये इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन

History, Shiv - History TV18 चॅनेलवर आज रात्री 8 वाजता चांगली डाॅक्युमेंट्री पाहायला मिळणार आहे

  • Share this:

मुंबई, 05 सप्टेंबर : इतिहास, पुराण, परंपरा यांचा संगम करून हिस्ट्री चॅनेलवर ‘Mahakaleshwar - Legends of Shiva’ ही डाॅक्युमेंट्री दाखवली जाणार आहे. आज (5 सप्टेंबर) रात्री 8वाजता हिस्ट्रीवर या डाॅक्युमेंट्रीचा प्रीमियर आहे. उजैन हे भारतातलं पुरातन शहर. इतिहास आणि पुराण यांचा सुंदर मिलाफ या शहरात पाहायला मिळतो. इथलं महाकालेश्वर हे शंकराचं मंदिर प्रसिद्ध आहे. त्याबद्दलच आपल्याला या डाॅक्युमेंट्रीत पाहायला मिळणार आहे.

अंबानींच्या गणेश पूजेला प्रियांकाच्या भावासोबत दिसलेली ती 'मिस्ट्री गर्ल कोण?

उजैन हे मध्य प्रदेशातलं एक आधुनिक शहर. तरीही भूतकाळातले अनेक ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ इथे पाहायला मिळतात. उजैन हे उजैनी नावानंही प्रसिद्ध आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनासाठीही हे शहर प्रसिद्ध होतं. महाकालेश्वर मंदिर जिथे आहे तिथे प्राचीन भारतीय रेखावृत्त आणि कर्कवृत्त एकत्र येतात असं म्हटलं जातं. उजैनमध्ये प्राचीन वेधशाळाही आहे. इथे विक्रम संवत्सर हे हिंदू कॅलेंडर वापरलं जातं. उजैनचे हे विविध पैलू, परंपरा, श्रद्धा, शिवाचा उत्सव हे सगळं पाहायला मिळणार आहे महाकालेश्वर - लीजंड ऑफ शिवा या डाॅक्युमेंट्रीत. आज रात्री HISTORY TV18 या वाहिनीवर रात्री 8 वाजता पाहायला मिळेल.

महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. इथे शिवाचं अस्तित्व असल्याची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला देशभरातून लाखो भक्त इथे दर्शनाला येतात. शिव-पार्वतीच्या संगमाचा सण महाशिवरात्र इथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. भारतीय संस्कृती, परंपरा याचं सुंदर दर्शन इथे होतं.

चुकीला माफी नाही! बाप्पाची पूजा करताना सलमान चुकला, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

हे सर्व काही या 'महाकालेश्वर - लीजंड ऑफ शिवा' या डाॅक्युमेंट्रीत पाहायला मिळणार आहे. तेव्हा आज ( 5 सप्टेंबर ) रात्री 8 वाजता याचा प्रीमियर हिस्ट्री टीव्ही 18वर पाहायला विसरू नका.

VIDEO : भर सभेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांची स्फोटक मुलाखत

Published by: Sonali Deshpande
First published: September 5, 2019, 4:50 PM IST
Tags: History

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading