जर्मनीत प्रियांका चोप्रा भेटली मोदींना

जर्मनीत प्रियांका चोप्रा भेटली मोदींना

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उंचावणाऱ्या प्रियांकाला मोदी भेटले. प्रियांकानं ट्विट करून मोदींचे आभार मानले.

  • Share this:

30 मे : अनेकदा एखाद्या पार्टीत किंवा रस्त्यावर कुणी ओळखीचं अचानक भेटतं. न ठरवता. आणि हा योगायोग झाला की आपण खूश होतो. पण हाच योगायोग सुपर सेलिब्रिटींच्या बाबतीत झाला तर ?

असंच झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियांका चोप्राबाबत. सध्या मोदी जर्मनीत आहेत. आणि प्रियांकाही 'बेवाॅच'च्या प्रमोशनसाठी जर्मनीत पोचली होती. तिला जेव्हा कळलं की मोदी जर्मनीतच आहेत, तेव्हा तिनं त्यांना भेटण्याची वेळ मागितली.

मोदींनीही तिला निराश केलं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उंचावणाऱ्या प्रियांकाला मोदी भेटले. प्रियांकानं ट्विट करून मोदींचे आभार मानले.

प्रियांकाचा 'बेवाॅच' भारतात 2 जूनला रिलीज होणार आहे. परदेशात हा सिनेमा आधीच रिलीज झालाय.

First published: May 30, 2017, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading