डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत येणार हृदयस्पर्शी वळण

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत येणार हृदयस्पर्शी वळण

स्टार प्रवाहावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका सुरू आहे. ऐतिहासिक मालिका प्रेक्षक जास्त पाहतायत, असं एकूण चित्र दिसतंय.

  • Share this:

मुंबई, 07 जून : स्टार प्रवाहावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका सुरू आहे. आंबेडकरांचं अख्खं आयुष्य प्रेक्षकांसमोर साकारलं जातंय. प्रेक्षकही ही मालिका आवडीनं पाहतायत. बुद्ध पौर्णिमेला ही मालिका सुरू झाली. ऐतिहासिक मालिका प्रेक्षक जास्त पाहतायत, असं एकूण चित्र दिसतंय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पुढील आठवड्यात अत्यंत भावनिक वळण येणार आहे . छोट्या भिवाने लहानपणीच आईचं छत्र गमावलंय. आईच्या आठवणीने व्याकुळ भिवाच्या मनाची घालमेल होतेय. लहान मुलांची होणारी परवड आणि घर सांभाळायला कुणीच नसल्यामुळे भिवाचे बाबा म्हणजेच रामजी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतात. भिवाला मात्र दुसऱ्या आईचं येणं पटत नाही.

Bigg Boss Marathi 2- अभिजीत बिचकुलेंनी शिवानीसाठी गायले खास गाणे...

OMG! या 5 अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं धोनीचं नाव

भिवाचं आईवर खूप प्रेम. एवढ्या लहानपणी मातृवियोगानं भिवा अस्वस्थ आहे. दु:खी आहे. बयेची म्हणजे पहिल्या आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही या मतावर तो ठाम असतो. आईचं जाणं आणि सावत्र आईचं येणं या प्रसंगातून भिवाच्या लहानग्या मनावर कसा परिणाम होतो, हे दाखवलं जाणार आहे.

जिमच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद झाला इम्रान खान, ओळखताही येणं अशक्य

भिवाची भूमिका करतोय अमृत गायकवाड. अमृत मूळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची~आवड आहे. फावल्या वेळात गाणी ऐकणं हा त्याचा आवडता छंद.

मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरू होती तेव्हा अमृतला त्याबद्दल कळलं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं. त्याचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची छोट्या आंबेडकरांच्या भूमिकेसाठी निवड झाली.

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत मोठेपणीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेविषयी सांगताना तो म्हणाला, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचं कर्तृत्व खरंच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने आंबेडकर उलगडत आहेत.'

चिपळूणमध्ये गावात शिरली महाकाय मगर, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2019 08:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading