डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतल्या कलाकारांनी पर्यावरणासाठी उचललं 'हे' पाऊल

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतल्या कलाकारांनी पर्यावरणासाठी उचललं 'हे' पाऊल

Dr. Babasaheb Ambedkar, Star Pravah - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतल्या कलाकारांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : स्टार प्रवाहवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिका सुरू आहे. आंबेडकरांचे पुरोगामी, प्रगतीशील विचार मालिकेद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोचत असतात. अनेकदा भूमिका साकारताना कलाकारही तसाच वागायला लागतो. आजच्या काळाला अनुसरून अशीच काही सुधारणा करणारी पावलं या टीमनं उचललीयत. पर्यावरण रक्षणासाठी 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेतल्या कलाकारांनी एक निर्णय घेतलाय.

निसर्गाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचा निर्णय या मालिकेच्या संपूर्ण टीमने घेतला आहे. यातलाच पहिला प्रयत्न म्हणजे सेटवर वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या वापरावर केलेली बंदी. दशमी प्राॅडक्शन आणि कलाकारांनी या निर्णयाला पसंती दर्शवली आणि सेटवर स्टीलच्या बाटल्या दाखल झाल्या. प्रत्येक बाटलीवर कलाकार, दिग्दर्शक आणि इतर टीमची नाव देण्यात आली आहेत.

शनायानं शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, 'हे' आहे कारण

याबद्दल अदिती द्रविड म्हणाली, ' प्लास्टिक हे आरोग्याला हानीकारक असतं. याची जाणीव प्रत्येकानंच ठेवली पाहिजे. कुठल्याही बदलाची सुरुवात स्वत:पासून होते. ही सुरुवात करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. आम्हाला आमचं आणि आमच्या व्यक्तिरेखेचं नाव लिहिलेल्या बाटल्या दशमी प्राॅडक्शनकडून देण्यात आल्या आहेत.'

साराच्या फॅमिलीला इंप्रेस करण्यासाठी कार्तिक आर्यनची धडपड!

मालिकेत लवकरच रमा आणि भीवा यांचा विवाहसोहळाही पहायला मिळणार आहे. डाॅ. आंबेडकरांच्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी रमाबाई त्यांच्या पाठी उभ्या राहिल्या. आता मृण्मयी ही भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतेय. मुख्य म्हणजे मालिकेतली बोलीभाषा शिकतेय. तशी देहबोली शिकतेय.सागर देशमुख डाॅ. बाबासाहेबांची भूमिका साकारणार आहे, तर मोठ्यापणीच्या रमाबाई साकारतेय अभिनेत्री शिवानी रांगोळे.

या मालिकेतल्या छोट्या आंबेडकरांची भूमिका साकरली अमृत गायकवाडनं. मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरु होती तेव्हा अमृतला त्याबद्दल कळलं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं. त्याचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची छोट्या आंबेडकरांच्या रोलसाठी निवड झाली.

VIDEO: चित्रा वाघ स्वत:च शरद पवारांना उत्तर देतील - मुख्यमंत्री

Published by: Sonali Deshpande
First published: July 31, 2019, 1:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading