विक्रांत सरंजामेनंतर आता हा 'नायक'ही करणार हटके प्रपोझ

'छत्रीवाली' मालिकेतील मधुरा आणि विक्रमच्या नात्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळतायत. मधुरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रमने बऱ्याचदा आपल्या प्रेमाची कबुली दिलीय.

News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2018 09:49 AM IST

विक्रांत सरंजामेनंतर आता हा 'नायक'ही करणार हटके प्रपोझ

मुंबई, 13 डिसेंबर : विक्रांत सरंजामेनं ईशाला प्रपोझ केलं. झी मराठीवरच्या 'तुला पाहते रे'मधला हा हाय पाॅइंट. एकूण नजर टाकता इतरही मालिका एक गोष्ट हिट ठरली, की त्यावरच पाऊल टाकताना दिसतात.

'स्टार प्रवाह'वरील 'छत्रीवाली' मालिकेतील मधुरा आणि विक्रमच्या नात्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळतायत. मधुरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रमने बऱ्याचदा आपल्या प्रेमाची कबुली दिलीय. मधुराला वेगवेगळी सरप्राईजेसही दिली आहेत. एवढंच नाही तर त्याने आपला जीव धोक्यात घालून मधुराला मनवण्याचा प्रयत्न केलाय.

मधुराचं प्रेम जिंकण्यासाठी विक्रम वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यासाठी त्याने आणखी एक शक्कल शोधून काढलीय. मधुराला लग्नाची मागणी घालण्यासाठी विक्रम सज्ज झालाय आणि तेही बँड बाजा घेऊन. नवरदेवाप्रमाणे हातात फुलांची माळ घेऊन तो मधुराला लग्नासाठी विचारणा करणार आहे. छत्रीवाली मालिकेचा हा रंगतदार एपिसोड १७ जानेवारीला प्रेक्षकांना पहाता येईल.

काही दिवसांपूर्वी 'छत्रीवाली' मालिकेचा महाएपिसोड झाला होता. 'छत्रीवाली'च्या खास भागातून पाहायला मिळाली विक्रम आणि मधुरामधली रोमॅण्टिक केमिस्ट्री. मधुराप्रमाणेच मधुराच्या आईचं मन जिंकण्याचं आव्हान विक्रमपुढे आहे. आजीच्या रूपात लव्हगुरु मिळाल्यामुळे विक्रमचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळेच त्याने कंपनीतले सहकारी, मधुरा तिची आई आणि आजीसोबत एक खास पिकनिक प्लॅन केली.

मधुराला इम्प्रेस करण्याचा विक्रमचा हा प्रयत्न यशस्वी होणार का? विक्रमच्या प्रेमाचा मधुरा स्वीकार करणार का? याचा उलगडा पुढच्या भागामध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 09:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...