रमेश देव घेऊन येतायत नवा ट्विस्ट

रमेश देव स्वत: 92 वर्षांचे आहेत. पण तरुणांना लाजवेल अशी त्यांची एनर्जी आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 07:34 PM IST

रमेश देव घेऊन येतायत नवा ट्विस्ट

मुंबई, 31 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी कानाला खडा या शोमध्ये ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि सीमा देव आल्या होत्या. त्यावेळी पुन्हा एकदा त्यांचं लग्न लावण्यात आलं होतं. तसंच रमेश देव यांनी डान्सही केला. ते स्वत: 92 वर्षांचे आहेत. पण तरुणांना लाजवेल अशी त्यांची एनर्जी आहे.

छत्रीवाली मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची एण्ट्री झालीय. सदानंद कुलकर्णी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून बिझनेस जगतात त्यांची वेगळी ओळख आहे. सदानंद कुलकर्णी पुण्यात त्यांची नात नीलम हिच्यासोबत रहातात. गायकवाड कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अरुंधती म्हणजे विक्रमच्या आईला ते मुलीप्रमाणे मानायचे. अरुंधतीचा नवरा म्हणून सूर्यकांत यांची सदानंदरावाशी ओळख झाली. सूर्यकांतसाठी सदानंद म्हणजे आदर्श ठरले आणि ते त्यांना बिझनेस गुरु मानु लागले. आजारपणात विक्रमची आई म्हणजेच अरुंधतीने जगाचा निरोप घेतला. सदानंद यांची नात नीलम हिचं विक्रमशी लग्न व्हावं ही तिची अंतिम इच्छा होती. अरुंधतीची हीच इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने सदानंद यांची मालिकेत एण्ट्री झाली आहे.

विक्रम आणि मधुराचं नातं निर्णायक वळणावर असतानाच आता सदानंद यांच्या एण्ट्रीने ही गुंतागुंत आणखी वाढणार आहे. एकीकडे मधुरावरचं प्रेम तर दुसरीकडे आईची अंतिम इच्छा हा गुंता विक्रम कसा सोडवणार? याची उत्कंठावर्धक कहाणी ‘छत्रीवाली’च्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.

मधुराचं प्रेम जिंकण्यासाठी विक्रम वाट्टेल ते करायला तयार झाला. त्यासाठी त्याने आणखी एक शक्कल शोधून काढली. मधुराला लग्नाची मागणी घालण्यासाठी विक्रम सज्ज झाला आणि तेही बँड बाजा घेऊन. नवरदेवाप्रमाणे हातात फुलांची माळ घेऊन त्यानं मधुराला लग्नासाठी विचारणा केली आहे.


Loading...

प्रियांकाच्या ड्रेसची किंमत पाहून तुम्हाला तुमचे महागडे पोशाखही वाटतील स्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 07:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...