News18 Lokmat

'बिग बाॅस'च्या घरात आत्महत्येचा प्रयत्न,झुबेर खाननं घेतल्या झोपेच्या गोळ्या

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकाने घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. झुबेर खान असं या स्पर्धकाचं नाव असून सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2017 07:41 PM IST

'बिग बाॅस'च्या घरात आत्महत्येचा प्रयत्न,झुबेर खाननं घेतल्या झोपेच्या गोळ्या

08 आॅक्टोबर : बिग बॉसच्या घरातील स्पर्धकाने घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. झुबेर खान असं या स्पर्धकाचं नाव असून सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बिग बॉसचा अकरावा सिझन सुरू होऊन आठवडाच झालाय. आणि पहिल्याच आठवड्यात घरातल्या स्पर्धकांनी भांडणं करून उच्छाद मांडला. त्यात एकमेकांची उणीदुणी काढण्यापासून एकमेकांवर शिवीगाळ करण्यापर्यंत स्पर्धकांची मजल गेली. यात सगळ्यात आघाडीवर होता डोंगरीचा झुबेर खान. त्यामुळे काल सलमान खानने याबाबत त्याला जाब विचारून त्याला चांगलंच खडसावलं.

यानंतर टेंन्शनमध्ये आलेल्या झुबेरने रात्री घरात गोळ्या खाल्ल्या त्यामुळे सकाळी त्याला रूग्णालयात दाखल करायची वेळ शोच्या टीमला आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2017 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...