नवी दिल्ली,13 जानेवारी : कोरोना महामारीनंतर (Corona Pandemic) बऱ्याच देशात अजूनही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघण्यावर सक्ती आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त OTT प्लॅटफॉर्मवर आपला वेळ घालवतात दिसतात. गेल्या काही महिन्यात बॉलिवूडचे बरेच चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. लॉकडाऊन दरम्यान OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रायबर्सही वाढलेत. आता OTT प्लॅटफॉर्मही आपले सब्सक्रायबर्स टिकवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर्स घेऊन येत आहे.
OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) 2021 च्या सुरवातीलाच एक धमाकेदार घोषणा केली आहे. 2021 मध्ये नेटफ्लिक्सने प्रत्येक आठवड्यात दर्शकांना नवीन चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. म्हणजेच नेटफ्लिक्सच्या घोषणेतून या वर्षात नेटफ्लिक्स 70 नवे सिनेमे प्रदर्शित करणार असल्याची माहिती आहे. नेटफ्लिक्सने नुकतंच 'रेड नोटिस' (Red Notice), 'आर्मी ऑफ द डेड' (Army Of The Dead), 'डोन्ट लुक अप' (Don't Look Up), 'टिक टिक.. बूम' (Tik Tik Boom), 'द व्हाईट टाइगर' (The White Tiger), 'द गर्ल ऑन द ट्रेन' (The Girl On The Train) सारख्या बहुचर्चित सिनेमांचे ट्रेलर लाँच केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स वर्षभरात प्रदर्शित करणार असलेल्या या 70 सिनेमांपैकी 52 इंग्रजी सिनेमे, 8 अॅनिमेटेड सिनेमे आणि 10 नॉन-इंग्रजी सिनेमांचा समावेश असणार आहे.
2021 = a new movie EVERY WEEK on Netflix. Here's a sneak peek at 27 of the biggest, brightest, fastest, funniest, feel-good, feel-everything films and stars coming to Netflix this year pic.twitter.com/iCr1ZPrc7W
— NetflixFilm (@NetflixFilm) January 12, 2021
नेटफ्लिक्सने पहिल्यांदाच त्यांचा ईयर प्लॅन दर्शकांपुढे मांडला आहे. सध्या नेटफ्लिक्सचे जगभरात 200 कोटींच्या जवळपास सब्सक्रायबर्स आहेत.