मुंबई, 3 सप्टेंबर : कृष्णाष्टमी, दहिहंडी म्हटलं की आठवतं ते राधाकृष्णाचं प्रेम. या प्रेमाचं कुतूहल अनेकांना पुरातन काळापासून आहे. आणि लोकांची ही आवड लक्षात घेता बाॅलिवूडच्या एक दिग्दर्शकानं ते मोठ्या पडद्यावर साकारायचं ठरवलंय.
इम्तियाज अली राधाकृष्णाची प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत. प्रेमकथा रुपेरी पडद्यावर प्रभावीपणे मांडणारा दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अली ओळखला जातो. ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’, ‘हायवे’ यांसारख्या दमदार प्रेमकथा त्याने प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. आता इम्तियाज राधा-कृष्णाची प्रेमकथा एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आणत आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
इम्तियाज म्हणाला, 'मला राधाकृष्णाच्या प्रेमाबद्दल आकर्षण वाटतंय. माझ्या जवळचा हा विषय. खूप दिवस मला यावर सिनेमा करायचा होता.' पुराणकाळापासून राधा-कृष्णाचं प्रेम पुजलं जातं. त्यांची मंदिरं उभारली जातात. त्यांनी कधी लग्न नाही केलं. तरीही त्यांच्या प्रेमाचे दाखले दिले जातात.
अद्वितीय अशा या प्रेम कहाणीची भुरळ बाॅलिवूडला पडली नसती तरच नवल. म्हणूनच इम्तियाजनं या सिनेमाची घोषणा केली.
दरम्यान, इम्तियाजचा आगामी ‘लैला-मजनू’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यामध्ये तृप्ती दिमरी आणि अविनाश तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
शिवाय 'जब वी मेट'च्या सिक्वेलनिमित्तानं शाहिद आणि करिना पुन्हा मोठ्या पडद्यावर रोमांस करताना चाहत्यांना पहायला मिळणार आहे. या सिनेमामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. 11 वर्षांआधी करिना आणि शाहिदचा जब बी मेट हा सिनेमा ब्लॉकबस्टर झाला होता. आता त्या सिक्वेल बनवण्यात येणार आहे. हा सिनेमा चाहत्यांच्या मनावर काय जादू करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epic love story, Film on radha krishnas, Imtiaz Ali, Radha krishna