• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • टायगर 3 : सलमानला टक्कर देण्यासाठी इम्रान हाश्मीनी केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

टायगर 3 : सलमानला टक्कर देण्यासाठी इम्रान हाश्मीनी केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

आपल्या या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑगस्ट:अभिनेता इम्रान हाश्मी म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर ना कोणी फिटनेस फ्रीक येतो, ना कोणी ॲक्शन हिरो. एरवी फक्त कंटेंट बेस्ड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या इम्रानने मात्र आता वेगळी वाट निवडून आपल्या फॅन्सना आश्चर्यचकित (Imran Hashmi surprises fans) केलं आहे. सलमान खानच्या टायगर 3 (Tiger 3) या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी झळकणार आहे. यासाठी इम्रानने जिममध्ये जाऊन सिक्स पॅक अब्ज (Imran Hashmi six pack abs) कमावले आहेत. आपल्या या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनचा (Imran Hashmi body transformation) फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. बॉलिवूडमध्ये इम्रान हाश्मीची इमेज ही सुरुवातीला ‘सीरियल किसर’ अशी होती. याला कारण होते, त्याचे सुरुवातीचे काही चित्रपट. मात्र, त्याने गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटांच्या कथेला प्राधान्य देत, त्यानुसार चित्रपट निवड केली. यामुळे एक गुणी अभिनेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. आता इम्रान हाश्मी हा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan and Imran Hashmi) सोबत दिसून येणार आहे. टायगर 3 चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी इम्रान सध्या जिममध्ये (Imran Hashmi gym) घाम गाळत आहे. जिम वर्कआऊट नंतरचे आपले काही फोटो (Imran Hashmi workout pics) त्याने सोशल मीडियावर शेअर करत फॅन्सना सरप्राईज दिलं आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे वाचा - 'परी म्हणू की अप्सरा'; नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटेना यातील एका फोटोमध्ये इम्रान ब्लॅक आउटफिटमध्ये आपले बायसेप्ट्स दाखवताना दिसून येत आहे. यात त्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावला आहे. ‘जस्ट अनादर आर्म्स डे’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. यापूर्वी इम्रानने आपले सिक्स पॅक अब्स दाखवणारा फोटो शेअर केला होता. ‘ही तर केवळ सुरूवात आहे’ अशा आशयाचं कॅप्शन त्याने आपल्या पोस्टला दिलं होतं. इम्रानच्या या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवर त्याचे चाहते भलतेच खुश आहेत. ‘किलर लूक’, ‘कान्ट वेट टू सी यू इन टायगर 3’ अशा कमेंट्स फॅन्स त्याच्या पोस्टवर करत आहेत. एका चाहत्याने तर चक्क ‘टायगर 3 मध्ये आता सलमान बेदम मार खाणार’ अशा आशयाची कमेंट केली होती. यासोबतच, कित्येक फॅन्स त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. टायगर 3 हा सलमान खानची सुपरहिट मूव्ही फ्रँचायझी ‘एक था टायगर’चा तिसरा भाग असणार आहे. पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणेच यामध्येही सलमान खान सोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif in Tiger 3) दिसून येईल. सलमान खान यात पुन्हा एकदा एजंट अविनाश सिंग राठोडच्या भूमिकेत असेल. तर, कॅटरीना कैफदेखील पुन्हा एकदा झोया हुमानीची भूमिका साकारणार आहे.
  First published: