Home /News /entertainment /

बॉलिवूडमधून महत्त्वाची अपडेट; सुपरस्टार सलमान खानला न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश

बॉलिवूडमधून महत्त्वाची अपडेट; सुपरस्टार सलमान खानला न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश

salman khan

salman khan

सलमान खान यापूर्वीही अनेक प्रकरणात अडकला आहे.

    जोधपुर, 14 सप्टेंबर : काळवीट शिकार प्रकरण आणि आर्स अॅक्ट प्रकरणाच चित्रपट अभिनेता सलमान खानला जिल्हा सेशन न्यायालय जोधपूर येथे 28 सप्टेंबर रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची आज सुनावणी सुरू होती. काळवीट प्रकरण व राज्य सरकारच्या याचिकेवर आर्स अॅक्ट प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. यानंतर पुढील सुनावणीदरम्यान सलमान खानला स्वत: कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सलमानने यापूर्वी हजर होऊ शकणार नसल्याचं अपील केलं होतं, ज्याचा स्वीकार करण्यात आला होता. आता 28 सप्टेंबर रोजी जोधपूर कोर्टात सलमान याला हजर राहावे लागणार आहे. या आदेशानंतर सलमान खान स्वत: येथे उपस्थित राहतात की पुन्हा उपस्थितीबाबत अपील करणार याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. ऑक्टोबर 1998 मध्ये जोधपूरमध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते. यादरम्यान जोधपूर शहरापासून लागून असलेल्या कांकणी गावातील हद्दीत दोन काळवीटांची शिकार करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे ही वाचा-कंगना रणौत होणार भाजपची स्टार प्रचारक? अखेर फडणवीसांनी दिलं उत्तर... यापूर्वी सलमान खानवर काळवीट प्रकरणाबरोबर फूटपाथवरील नागरिकांना चिरडल्याचा आरोप आहे. राजस्थानात 1998 मध्ये ‘हम साथ साथ है‘ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरविण्यात आलं होतं. या प्रकरणी त्याला जोधपूर कारागृहात जावं लागलं आहे. या प्रकरणात सलमानसह चित्रपटातील अन्य कलाकार सैफअली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे व नीलम यांच्यावर आरोप करण्यात आले होते. पण, सलमानकडे शस्त्र सापडल्यानं त्याला दोषी ठरविण्यात आलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Salman khan

    पुढील बातम्या