इम्रान खानची बायको डिप्रेशनमध्ये, ट्रिटमेन्टसाठी दररोज जातेय वेलनेस सेंटरमध्ये

इम्रान खानची बायको डिप्रेशनमध्ये, ट्रिटमेन्टसाठी दररोज जातेय वेलनेस सेंटरमध्ये

Imran Khan Wife अवंतिकाच्या नजिकच्या काळातल्या सोशल मीडिया पोस्टवरून ती डिप्रेशनमध्ये असल्याचं दिसून येतं.

  • Share this:

मुंबई, 27 जून : आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या बी- टाऊनमध्ये जोर धरत आहेत. दोघांच्या नात्यात दुरावा आला असून अवंतिका इम्रानचं राहतं घर सोडून माहेरी गेली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात इम्रानला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले असता त्यानं यावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. तसेच अवंतिकाच्या आईनंही त्यांच्यात वाद असले तराही आम्ही त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र नुकतंच स्पॉटबॉयईनं दिलेल्या वृत्तानुसार सध्या इम्रानची पत्नी अवंतिका डिप्रेशनचा सामना करत असल्याची माहिती समोर आली आहे.

कतरिना कैफने शेअर केला 'आई'सोबतचा टॉवेलमधला फोटो

इम्रानचं घर सोडल्यानंतर अवंतिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून खान आडनावही काढून टाकलं होतं. आता अवंतिका फक्त मलिक हेच आडनाव लावते. दोघांमध्ये अनेक कारणांवरून वाद सुरू होते. मतभेद एवढे वाढले की तिने इम्रानचं पाली हिलमधलं घर सोडण्याचा निर्णय घेतला. स्पॉटबॉयईनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या सर्व घटनांचा अवंतिका परिणाम झाला असून ती सध्या डिप्रेशनमध्ये आहे. यासाठी तिनं एका वेलनेस सेंटरला भेट दिली. ती रोज 2 तासांचं सेशन अटेंड करत असून यासाठी ती अ‍ॅस्ट्रोलॉजर रामोना मॉर्डके (Ramona Mordecai) हिला कन्सल्ट करत आहेत.

जनरल सॅम मानेकशॉ, ज्यांच्या सात गोळ्याही काहीच बिघडवू शकल्या नाहीत!

अवंतिकाच्या नजिकच्या काळातल्या सोशल मीडिया पोस्टवरून ती डिप्रेशनमध्ये असल्याचं दिसून येतं. इम्रान आणि अवंतिकाने आठ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2011 मध्ये लग्न केलं. इम्रानच्या लग्नात आमिर खान आणि किरण रावसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दोघांना एक मुलगी असून 2014 मध्ये तिचा जन्म झाला होता. काही दिवसांपूर्वी एका हेल्थ अवेअरनेस कॅम्पेनमध्ये अवंतिका मुलगी इमारासोबत सहभागी झाली होती. मात्र यावेळी इम्रान त्यांच्यासोबत उपस्थित नव्हता.

...तर मलायका अरोरा आणि अरबाज खान पुन्हा येणार एकत्र?

=======================================================

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

First published: June 27, 2019, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading