अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप, प्रेग्नंट असल्याची झाली होती चर्चा

या दोघांची जोडी तिच्या चाहत्यांनाही आवडत होती. आता मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं पूर्णपणे बंद केलं असून लवकरच ते वेगळे होणार असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री इलियाना डिक्रूज ही तिच्या सिनेमांपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहते. गेल्या अनेक वर्षांपासून ती ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्य्रू नीबोनला डेट करत होती.

आता दोघांचं नातं संपुष्टात आल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी गुपचूप लग्न केल्याची आणि इलियाने गरोदर असल्याची चर्चा होती. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय.

इलियाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आतापर्यंत तिने प्रियकरासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. या दोघांची जोडी तिच्या चाहत्यांनाही आवडत होती. आता मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं पूर्णपणे बंद केलं असून लवकरच ते वेगळे होणार असल्याचं बोललं जात आहे.

इलियानाचे चाहते जे तिला सोशल मीडियावर फॉलो करतात त्यांना हे माहितीच असेल की, इलियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अँड्य्रूचे अनेक फोटो होते. पण आता तिने प्रियकराचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.

एवढंच नाही तर अँड्य्रूच्या इन्स्टाग्रामवरूनही त्याने इलियानाचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. स्पॉटबॉयइने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. या भांडणात कोणीही पडती बाजू घ्यायला तयार नाही.

इलियाने तेलगू सिनेमा देवदासूमधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. इलियाने तिच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे सांगितलं नाही. मात्र इन्स्टाग्रामवर प्रियकरासोबतचे फोटो ती सतत शेअर करतच होती. अनेक फोटोंमध्ये तिने अँड्य्रूला 'Hubby' असं म्हटलं होतं. यावरूनच दोघांनी लग्न केल्याचं म्हटलं जात होतं.

गेल्या वर्षी इलियाना गरोदर असल्याचीही बातमी समोर आली होती. मात्र ती नंतर अफवा असल्याचं तिने सांगितलं. एका मुलाखतीत इलियाना म्हणाली होती की, तिचं खासगी आयुष्यावर कोणतंही गॉसिप व्हावं अशी तिची इच्छा नाही.

यानंतर गरोदरपणाच्या अफवेवर पोस्ट टाकत तिने लिहिलं होतं की, 'चांगल्या गोष्टी ऐका आणि वाईट गोष्टी सोडून द्या.'

तिच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर इलियानाने अजय देवगणच्या ‘रेड’ सिनेमात शेवटचं काम केलं होतं. याशिवाय ती तेलगू सिनेमा ‘अमर अकबर अँथनी’मध्येही दिसली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2019 02:07 PM IST

ताज्या बातम्या