SEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...

SEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...

इलियानाच्या सेक्स आणि इंटिमेसीबाबत केलेल्या वक्तव्यानं सगळीकडे खळबळ माजली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : बॉलिवूडच्या काही अभिनेत्री पक्त सुंदर दिसण्यासाठीच नाही तर त्यांच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठीही ओळखल्या जातात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे इलियाना डिक्रूझ. ती नेहमीच कोणत्याही मुलाखतीत बिनधास्त उत्तर देताना दिसते. पर्सनल ते प्रोफेशनल लाइफ पर्यंत कोणतीही गोष्ट ती मीडियापासून लपवून ठेवत नाही. काही दिवसांपूर्वीच ब्रेकअपमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या इलियानाच्या सेक्स आणि इंटिमेसीबाबत केलेल्या वक्तव्यानं सगळीकडे खळबळ माजली आहे.

इलियानानं नुकतीच शिबानी दांडेकरचा शो ‘लव्ह लाफ लिव्ह’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिनं तिचं पर्सनल लाइफ ते प्रोफेशनल लाइफ पर्यंत दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच अभिनय क्षेत्रात येण्याचा कोणताही प्लान नव्हता. आपण बाय चान्स अभिनेत्री झाल्याचंही तिनं यावेळी सांगितलं. जर मी अभिनेत्री नसते तर मी एक प्रसिद्ध गायिका असते असं इलियाना म्हणाली.

Tanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज

या मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देताना इलियानानं इंटीमेसी आणि सेक्स या विषयांवर मोकळेपणानं आपली मतं मांडली. ती म्हणाली, ‘सेक्स आणि प्रेमाचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. पण सेक्समध्ये भावना असणं गरजेच आहे.’ इलियानाच्या मते, ‘सेक्स एका वर्कआउटप्रमाणे आहे. ते एंजॉय करता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रेमात असता त्यावेळी सेक्स अधिकच सुंदर ठरतं कारण त्यावेळी ती एक प्रक्रिया राहत नाही तर ते दोन आत्म्यांचं मिलन असतं.'

Indian Idol च्या स्पर्धकानं नेहा कक्करला केलं KISS, इतर परीक्षक का होते गप्प?

इलियाना नेहमीच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. ती अनेकदा बोल्ड फोटोशूट करत असते. काही दिवसांपूर्वी तिचे बिकिनी फोटो खूप चर्चेत राहिले होते. बॉलिवूडमध्ये येण्याआधी इलियानानं तेलुगू आणि तमिळ सिनेमात काम केलं आहे. तसेच तिचं लव्ह लाइफ सुद्धा खूप चर्चेत राहिलं होतं. बॉयफ्रेंड एंड्रयू नीबोन तिनं अनेक फोटो सोशल मीडियावर शेर केले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला आहे.

'या' सेलिब्रेटींनी शेअर केले HOT PHOTO, एक तर आहे युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंड

==============================================================

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

First published: October 22, 2019, 11:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading