मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ileana DCruz बनणार Katrina Kaif ची वहिनी? कतरिनाच्या भावाला इलियाना करतीये डेट

Ileana DCruz बनणार Katrina Kaif ची वहिनी? कतरिनाच्या भावाला इलियाना करतीये डेट

कतरिनाचा वाढदिवस 16 जुलैला साजरा झाला. मालदीवमध्ये आपल्या कुटुंबीय, जवळच्या मित्रांबरोबर कतरिनानं सेलिब्रेट केलेल्या बर्थडेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये एका व्यक्तीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती व्यक्ती कतरिनाच्या  फार जवळची व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे.  कोण आहे ती व्यक्ती जाणून घ्या.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 जुलै:  कतरिना कैफच्या सोशल मीडियावर तिच्या फॅन्सची अगदी बारीक नजर असते. मग तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो तर अगदी लगेचच व्हायरल झाले. कतरिनाचा वाढदिवस 16 जुलैला साजरा झाला. मालदीवमध्ये आपल्या कुटुंबीय, जवळच्या मित्रांबरोबर कतरिनानं सेलिब्रेट केलेल्या बर्थडेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंपैकी काही फोटोंमधील एका व्यक्तीनं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. ती आहे इलियाना डिक्रूझ इलियाना कतरिनाबरोबरच्या फोटोमध्ये कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आजतकच्या वेबसाईटवर याबद्दलच वृत्त देण्यात आलं आहे.

इलियाना सध्या कतरिनाच्या भावाला डेट करत आहे. त्यामुळे कतरिनाच्या भावंडांबरोबर तीही बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. इलियाना परत एकदा प्रेमात पडली आहे. 16 जुलै रोजी कतरिनानं मालदीवमध्ये आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कतरिनाबरोबर तिचा भाऊही आहे आणि त्याच्याबरोबरच इलियानाही या फोटोंमध्ये दिसत आहे. इलियाना सध्या सॅबेस्टियन लॉरेंट मिशेल या कतरिनाच्या भावाला डेट करत आहे.

सॅबेस्टियन लॉरेंट मिशेल हा व्यवसायाने मॉडेल आहे आणि तो ब्रिटनमध्ये राहतो. इलियाना आणि सॅबेस्टियनला कतरिनाच्या मुंबई आणि लंडनच्या घरामध्ये पाहिल्याचं काही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कतरिनाच्या लग्नातही सॅबेस्टियन हजर होता. गेल्या सहा महिन्यांपासून इलियाना आणि सॅबेस्टियन रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावरही हे दोघं एकमेकांना फॉलो करत आहेत. मालदीवमध्ये कतरिनाच्या फॅमिली, फ्रेंड्सबरोबर इलियाना होती याचाच अर्थ ती आणि सॅबेस्टीयनमध्ये नक्की काहीतरी नातं आहे, असं फॅन्सचं म्हणणं आहे.

इलियाना यापूर्वीही एका रिलेशनशीपमध्ये होती. पण तिचं ब्रेक अप झालं. फोटोग्राफर अँड्र्यू निबॉनबरोबर इलियाना रिलेशनशीपमध्ये होती. काही वर्षं एकमेकांसोबत राहिल्यानंतरही त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि ते नातं संपलं. एका इंटरव्ह्यूमध्ये इलियानानं आपलं ब्रेकअप झाल्याची कबुली दिली होती. अर्थातच या ब्रेकअपनंतर इलियानाला सावरायला काही वेळ लागला. पण आता तिनं पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची ठरवलेली दिसत आहे. आता सॅबेस्टिनबरोबरचं तिचं नातं असंच कायम राहू दे हीच तिच्या फॅन्सची इच्छा आहे. बॉलिवूड कलाकार आणि त्यांची रिलेशन्स हा सतत चर्चेचा विषय असतोच. ही नाती बदलत राहतात त्यामुळे बातम्याही तयार होतात. सगळ्याच कलाकारांचे चाहते त्यांच्या आयुष्यात उत्तम घडावं अशी प्रार्थना करत असतात.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Katrina kaif