15 नोव्हेंबर : 'न्यूड' सिनेमा इफ्फीतून वगळण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण खात्यानं दिले. न्यूड सिनेमा ज्युरींनी निवडला होता. त्यामुळे त्याचे पडसाद आता उमटायला लागलेत. दिग्दर्शक सुजोय घोष यांच्यानंतर अपूर्व असरानी यांनीही राजीनामा दिलाय. इफ्फी चित्रपट महोत्सवातून सेक्सी दुर्गा आणि न्यूड चित्रपटांना वगळण्यात आल्यामुळेच निवड समितीतले परीक्षक आपली नाराजी व्यक्त करतायत.
'ज्युरीच्या अध्यक्षांशी मी सहमत आहे. अतिशय चांगल्या चित्रपटांविषयी आमची जबाबदारी होती. पण आम्हाला अपयश आलंय. इफ्फी चित्रपट महोत्सवात भाग घेण्याची मला नैतिक परवानगी नाही,' अशी प्रतिक्रिया अपूर्वनं न्यूज 18 लोकमतला पाठवलीये.
अपूर्व असरानी 'अलिगढ'सारख्या अतिशय सुंदर चित्रपटाचा लेखक आणि एडिटर आहे. आता येऊन गेलेला सिमरन हा चित्रपटही त्यानंच लिहिला होता.
येत्या 20 नोव्हेंबरपासून गोव्यात इफ्फी सुरू होतंय.
>>
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा