मुंबई 15 मे: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान सतत चर्चेत असते. तिनं अद्याप सिनेसृष्टीत पदार्पण केलेलं नाही मात्र तरी देखील तिच्याकडं लाखोंचं फॅन फलोइंग आहे. तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडींवर एखाद्या नामांकित सेलिब्रिटीला लाजवतील इतक्या कॉमेंट्स असतात. अशी ही लोकप्रिय सेलिब्रिटी किड सध्या आपल्या वडिलांमुळं चर्चेत आहे. जर माझ्या मुलीला कुठल्या तरुणानं किस करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे ओठ कापेन असा इशारा स्वत: शाहरुख खाननं दिला आहे.
पाहुया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
शाहरुखनं काही वर्षांपूर्वी कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याच्यासोबत आलिया भट्ट देखील होती. दरम्यान करणनं आलियाला विचारलं तू पहिलं किस केलस त्यावेळी किती वर्षांची होतीस. यावर तिनं 16 असं उत्तर दिलं. यावर शाहरुख म्हणाला जर माझ्या मुलीला कोणी असं किस केलं तर मी त्याचे ओठ चिरुन टाकेन. या मुलाखतीचा व्हिडीओ शाहरुखच्या फॅन पेजनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अन् हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘ताई तुमच्याकडे खरंच मेंदू आहे का?’ ईदच्या शुभेच्छा देणारी कंगना इन्स्टावरही होतेय ट्रोल
View this post on Instagram
सुहाना सध्या अमेरिकेत अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहे. सुहाना तिच्या मित्र-मैत्रिंनीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अलिकडेच तिनं एका शॉर्टफिल्ममध्ये काम केलं होतं. या फिल्ममध्ये तिनं केलेला अभिनय पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता ती बॉलिवूडमध्ये कधी झळकणार याची चाहते वाट पाहात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Shah Rukh Khan