VIDEO: सामना पाहायला गेलेल्या सैफ अली खानचा पाकिस्तानी चाहत्याने उडवली थट्टा Saif Ali Khan | India Pakistan Match | World Cup 2019 |

VIDEO: सामना पाहायला गेलेल्या सैफ अली खानचा पाकिस्तानी चाहत्याने उडवली थट्टा Saif Ali Khan | India Pakistan Match | World Cup 2019 |

Saif Ali Khan | India Pakistan Match | World Cup 2019 | सामना संपल्यानंतर सैफ स्टेडिअममधून बाहेर पडत होता. सैफसोबत यावेळी को-स्टार आलिया फर्नीचरवालाही होती. तेव्हा एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने त्याचा पाठलाग केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जून- भारत आणि पाकिस्तानमधील सामना होऊन कित्येक दिवस उलटले तरी त्या विजयाचा जोश भारतीयांमध्ये कमी झालेला नाही. दरम्यान, पराभवाने संतप्त झालेल्या एका पाकिस्तानी चाहत्याने त्याचा सर्व राग सैफ अली खानवर काढला. सैफ भारत- पाकिस्तान सामना पाहायला गेला होता. सामना संपल्यानंतर सैफ स्टेडिअममधून बाहेर पडत होता. सैफसोबत यावेळी को-स्टार आलिया फर्नीचरवालाही होती. तेव्हा एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने सैफचा पाठलाग केला.

भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला होता. याच सामन्यात भारताला पाठिंबा दर्शवायला बॉलिवूड स्टार सैफ अली खानही गेला होता. सैफ जेव्हा मॅनचेस्टर मैदानातून बाहेर पडत होता तेव्हा पाकिस्तानी चाहत्याने सर्वांसमोर त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती दिसत नसली तरी त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्याने म्हटलं की, भारतीय क्रिकेट संघाचा हा ११ वा वॉटर बॉय आहे. इथे पाहा हा व्हायरल व्हिडिओ...

Bigg Boss Marathi 2- परागच्या त्या विनंतीवर रुपालीला आलं रडू

KGFस्टार यशने सांगितलं मुलीचं नाव, दोन दिवसांनी बायको म्हणाली मी पुन्हा प्रेग्नट

एवढंच बोलून तो थांबला नाही तर पुढे म्हणाला की, ‘सिनेमाद्वारे तो पाकिस्तानविरोधात खूप खेळला आहे. त्याने आमच्या अनेकांना मारलं आहे. त्याने आपल्या देशाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आमच्या अनेकजणांना मारलं.’ मोबाइल कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सैफ अली खान त्याच्या आगामी 'जवानी जानेमन' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. या सिनेमात तो पूजा बेदीची मुलगी आलिया फर्नीचरवालासोबत दिसणार आहे. रिपोर्टनुसार या सिनेमात सैफ आलियाच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 07:38 PM IST

ताज्या बातम्या