...म्हणून शोएब अख्तर सोनाली बेंद्रेला करणार होता किडनॅप, स्वतःच सांगितलं कारण

क्रिकेटच्या मैदानाच आपल्या वेगाने फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या शोएब अख्तरने एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला होता.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 01:47 PM IST

...म्हणून शोएब अख्तर सोनाली बेंद्रेला करणार होता किडनॅप, स्वतःच सांगितलं कारण

मुंबई, 15 जून- विश्व चषकाची क्रेझ संपूर्ण भारतात दिसून येत आहे. त्यातही उद्या रविवारी १६ जूनला होणाऱ्या भारत- पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे. एकीकडे सामन्यावर पावसाचं सावट आहे तर चाहतेही उद्याचा सामना काहीही झालं तर रद्द न होण्याचं देवाकडे साकडं घालत आहेत.

या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो. त्यातही विश्व चषकामध्ये आतापर्यंत पाकिस्तानने एकदाही भारताला हरवलं नाही. अशात यावेळीही विजयाची पुनरावृत्ती व्हावी अशी भारतीय क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे तर इतिहास पुसून टाकण्यासाठी पाकिस्तानी संघ उत्सुक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पाकिस्तान क्रिकेट आणि भारतीय सिनेमाशी निगडीत एक भन्नाट किस्सा सांगणार आहोत.

हेही वाचा- ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणादाच्या वडिलांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
क्रिकेटच्या मैदानाच आपल्या वेगाने फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या शोएब अख्तरने एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला होता. शोएब भारत दौऱ्यावर असताना त्याची ओळख अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी झाली आणि त्याचक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. एवढंच नाही तर सोनालीचा इंग्लिश बाबू देसी मेम हा सिनेमा पाहिल्यानंतर तो सोनालीचा फार मोठा चाहता झाला. तो सोनालीचा फोटो आपल्या पाकिटात घेऊन फिरायचा. तसंच त्याच्या खोलीत सोनालीचे पोस्टरही असायचे.

हेही वाचा- ‘या’ अभिनेत्यालाच लग्नाची मागणी घालत अश्लील मेसेज पाठवतात मुलं
 

View this post on Instagram
 

100 mph possible with a 100 kg ball? #cwc2019


A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar) on

पहिल्याच भेटीत मनाच्या मैदानावर क्लिन बोल्ड झालेल्या अख्तरने हा ही विचार आधीच करून ठेवला होता की जर सोनालीने त्याच्या मागणीला नकार दिला असता तर तो तिचं अपहरण करणार होता. पण या सर्व गोष्टी त्याने मस्करीतच सांगितली. यासंदर्भात सोनालीला विचारले असता तिने शोएब अख्तर नावाच्या कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूला ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं. सोनाली म्हणाली होती की, तिला क्रिकेटमध्ये फारसं स्वारस्य नसल्यामुळे तिला कोणत्याच खेळाडूचं नाव माहीत नसतं.

हेही वाचा- तैमुरला सोडा, लिसा रेच्या एक वर्षाच्या जुळ्या मुलींचे फोटो पाहिलेत का?

World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचं ग्रहण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close