आयुष्मान खुरानाने भारत- पाकिस्तान मॅचच्या थीमवर ‘आर्टिकल 15’ चा तयार केला VIDEO, तुम्हीही एकदा पाहाच

आयुष्मान खुरानाने भारत- पाकिस्तान मॅचच्या थीमवर ‘आर्टिकल 15’ चा तयार केला VIDEO, तुम्हीही एकदा पाहाच

भारत- पाकिस्तान सामन्याच्यावेळी आपण सर्व भारतीय होतो. प्रत्येक जात- धर्म एक होऊन जातो. अशावेळी ‘आर्टिकल १५’ पूर्ण देशात सुंदरप्रकारे लागू होतो.

  • Share this:

मुंबई, 17 जून- अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ सिनेमाच्या एका कार्यक्रमात आयुष्मान खुरानाने नुकताच एक व्हिडिओ प्रदर्शित केला. भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या थीमवर हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये हजारो भारतीय टीम इंडियाला पाठिंबा देताना दिसत आहेत. यानंतर आयुष्मान खुरानाची एण्ट्री दाखवण्यात आली आहे. आयुष्मान म्हणतो की, ‘भारत- पाकिस्तान सामन्याच्यावेळी आपण सर्व भारतीय होतो. प्रत्येक जात- धर्म एक होऊन जातो. अशावेळी ‘आर्टिकल १५’ पूर्ण देशात सुंदरप्रकारे लागू होतो. याचा अर्थ आपल्याला भेदभाव घालवायला येतो. चला भारतीय होऊ.’ हा व्हिडिओ शेअर करताना आयुष्मानने लिहिले की, ‘भारत- पाकिस्तान सामन्यावेळी आपण सगळे भारतीय असतो. खऱ्या अर्थाने भारतीय. मग सर्व भेदभाव विसरून रोज फक्त भारतीय होऊया.’

हेही वाचा- अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द

हेही वाचा- VIDEO: मैदानात रणवीरने विराटला मारली मिठी, दिल्या विजयाच्या अनोख्या शुभेच्छा

आयुष्मान खुरानाने भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा दाखवत आपल्या आगामी ‘आर्टिकल १५’ सिनेमाचं प्रमोशनही केलं आहे. आयुष्मान लवकरच अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. येत्या २८ जूनला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

आयुष्मानशिवाय ईशा तलवार, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आयुष्मान खुरानाच्या आतापर्यंतच्या फिल्मी करिअरमधील हा सिनेमा सर्वात गंभीर आणि अभिनयाचा कस लावणारा आहे. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे. आतापर्यंत आयुष्मान हलक्या- फुलक्या सिनेमांमध्ये दिसत आला. त्याच्या करिअरमधील ही पहिली गंभीर भूमिका असल्यामुळे आयुष्मानने भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुद’ हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते.

हेही वाचा- भाच्याच्या बर्थडेमध्ये सलमान खानने केला स्टंट, हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच

First published: June 17, 2019, 5:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading