ICC World Cup 2019 मध्ये 'या' टीमला निक जोनसची पसंती

ICC World Cup 2019 मध्ये 'या' टीमला निक जोनसची पसंती

विश्वचषकाला केवळ चार दिवसांचा कालावधी उरला असून, त्यासाठी भारतीय संघ जय्यत तयारी करत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मे : बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांनी नुकतीच कान फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावत आपल्या हटके स्टाइलनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बायकोची काळजी घेणारा नवरा म्हणूनही यावेळी निकची चर्चा झाली. पण सध्या निक प्रियांकमुळे नाही तर एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. निकनं सोशल मीडियावर एका भारतीय चाहत्याच्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं त्यामुळे प्रियांकाही चकीत झाली आणि त्याच्या या उत्तरामुळे सध्या निकला 'नॅशनल जीजू' असं म्हटलं जातं आहे.

सोशल मीडियावर नुकतंच एका चाहत्यानं निकला प्रियांकाने तुला क्रिकेटबद्दल काय माहिती दिली आहे का आणि जर दिली असेल तर तु वर्ल्ड कपमध्ये कोणत्या टीमला सपोर्ट करणार असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना निक म्हणाला, 'मला क्रिकेटबद्दल जास्त काही माहिती नाही. मात्र प्रियांकानं काही प्रमाणात याची माहिती दिली आहे. पण त्याहून जास्त तिच्या काकांनी मला क्रिकेटबद्दल सांगितलं. यावर्षी होत असलेल्या वर्ल्डकपमध्ये मी अर्थातच टीम इंडियाला सपोर्ट करेन कारण या देशानं मला खूप प्रेम दिलं आहे.'

प्रियांका आणि निक मागील वर्षी 4 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांचा हा शाही विवाह सोहळा उमेद भवन पॅलेसमध्ये पार पडला. पण लग्नाच्या अगोदर वधू आणि वर पक्षामध्ये क्रिकेटची मॅच झाली होती ज्याचे फोटो प्रियांकानं स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत निक खूप चांगलं क्रिकेट खेळल्याचं सांगितलं होतं. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते. पण आता निकच्या उत्तरानं मात्र सर्व भारतीयांची मनं जिंकली आहेत हे नक्की.

विश्वचषकाला केवळ चार दिवसांचा कालावधी उरला असून, त्यासाठी भारतीय संघ जय्यत तयारी करत आहे. भारत यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 30मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना काय दिला सल्ला? या आणि इतर महत्त्वपूर्ण 18 घडामोडी, पाहा VIDEO

कपिल देव यांनी घेतला रणवीर सिंगचा 'क्लास', सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Bharat Dairies- कतरिना कैफचं हे हॉट साडी फॅशन स्टेटमेंट तुम्हीही करू शकता फॉलो

First published: May 26, 2019, 8:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading