मुंबई, 6 जुलै : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. सोनालीनं नुकतीच ICC Cricket World Cup च्या इंग्लंड आणि बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यांना हजेरी लावली होती. त्यानंतर सोनालीच्या नावाची सोशल मीडियावर सुरू आहे. यावेळी सोनाली अनेक फोटो सुद्धा व्हायरल झाले होते. ज्यावर वेगवेगळे मीम्स बनवले गेले. त्यानंतर आता सोनालीनं केलेलं एक ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
सोनालीनं पहिल्यांदा इंग्लंड विरुद्धच्या सामन्याला हजेरी लावली. त्यावेळी भारतानं हा सामना हरल्यानंतर अनेकांनी सोनालीवर मीम्स तयार करत यासाठी सोनालीला अनलकी म्हटलं होतं. तर बांग्लादेश विरूद्धचा सामना जिंकल्यानंतर याच नेटकऱ्यांनी सोनालीला लकी म्हटलं होतं यावर सोनालीनं 4 जुलैला एक ट्वीट केलं. त्यामध्ये ती या मीम्स प्रकरणाचा उल्लेख करत तिचा अनुभव सांगिताला, सोनाली म्हणाली, मी फोटो व्हायरल केले नाही किंवा मीम्सही बनवले नाही. त्यामुळे लकी किंवा अनलकी यात मला पडायचं नाही. यासोबतच तिनं कुछ तो लोग कहेंगे असा हॅशटॅगही वापरला आहे.
‘साहो’च्या कलेक्शनचा मार्ग कठीण, एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' तीन बिग बजेट सिनेमे
When #teamindia lost-माझ्यामुळे मॅच हरले - मी unlucky!
Now they won-माझ्यामुळे जिंकले,
so now I’m lucky! #veryfunny
ना मी photos viral केले,ना memes बनवले.
Lucky or unlucky कशाला त्यात पडायचं
I had a great time,that’s all that matters.अप्रतिम अनुभव.विषय संपला.#कुछतोलोगकहेंगे
— Sonalee (@meSonalee) July 4, 2019
बॉलिवूड असो वा मराठी सिने सृष्टी सर्वच कलाकारांना नेदमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं ट्रोल केल जात, त्यांचे मीम्स बनवून थट्टा केली जाते. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र काही जण त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहत नाहीत. सोनालीचं हे ट्वीट म्हणजे नेटकऱ्यांना अप्रत्यक्षपणे लगावलेला टोलाच म्हणता येईल. सोनालीचं हे ट्वीट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. यातून लोकांनी सोनालीला कितीही ट्रोल केलं तरी त्याचा काहीही परिणाम होत नसून लोकांना जे बोलायचं ते बोलू दे ती त्यांचा विचारही करत नाही हे स्पष्ट होतं.
'यात तर 20 लोकांचे कपडे होतील', कॉमेडियनने उडवली निया शर्माच्या ड्रेसची थट्टा
====================================================
SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?