'नमस्कार MS धोनीजी...' लता मंगेशकरांनी धोनीला केली ही जाहीर विनंती

'नमस्कार MS धोनीजी...' लता मंगेशकरांनी धोनीला केली ही जाहीर विनंती

ICC Cricket Worl Cup 2019 मधील भारताचे आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात आल्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी त्याचा अखेरचा वर्ल्ड कप खेळत होता. भारताचे आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात आल्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आता तो एकदिवसीय क्रिकेटलासुद्धा बायबाय करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण याबाबत अधिकृतपणे कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर ट्वीट करत त्याला निवृती विषयी विचारही करू नकोस अशी विनंती केली आहे.

ICC Cricket World Cup 2019 मधील भारताचं आव्हान सेमीफायनलमध्येच संपल्यानंतर लता मंगेशकर यांनी धोनीला उद्देशून एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं, 'नमस्कार एम एस धोनीजी, तुम्ही क्रिकेटमधून निवृत होणार आहात असं मी मागच्या काही दिवसांपासून ऐकत आहे. कृपया तुम्ही असा विचार करू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही निवत्तीचा विचारही मनात आणू नका.’ यासोबतच त्यांनी या पोस्टमध्ये धोनीला टॅग सुद्धा केलं आहे. पण या ट्वीवर धोनीनं अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

Sacred Game 2 : नवाजुद्दीन आणि सैफबरोबर झळकणार आणखी एक मराठी अभिनेत्री

भारताचा कर्णधार विराट कोहलीला यावर प्रश्न विचारण्यात आला. त्याला विचारलं की, वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी जाणार का? त्याने निवृत्तीबद्दल काही सांगितलं आहे का? धोनीच्या निवृत्तीबद्दलच्या प्रश्नावर विराट म्हणाला की, ‘धोनीनं त्याच्या भविष्याबाबत आम्हाला काही सांगितलेलं नाही. त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास त्यानं नकार दिला. विराटनं या प्रश्नावर साधलेलं मौन धोनीच्या निवृत्तीचे संकेत देणारं तर नाही ना असंही बोललं जात आहे. धोनीनं याआधी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्याशिवाय संघाचं कर्णधारपदही त्यानं अचानक सोडलं होतं.’

The Lion King मधून शाहरुखच्या मुलाचा डेब्यू, प्रेक्षकांना आर्यनच्या आवाजाची भुरळ

सेमीफायलनमध्ये धोनी उशिरा फलंदाजीला उतरला त्यावरूनही उलट सुलट चर्चा सुरू आहे. तर धोनीने पुन्हा संथ खेळी केली असंही म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, वर्ल्ड कपमधील अखेरचा सामना धोनीच्या एकदिवसीय कारकिर्दीतला अखेरचा सामना ठरू शकतो. मात्र, त्यानंतर धोनीने ही बाब फेटाळून लावत मलाच माहिती नाही कधी निवृत्ती घेईन असं सांगितलं होतं.

VIDEO : लंडनवरून परतली सारा, पिकअप करायला कार्तिक पोहोचला एअरपोर्टवर

====================================================

VIDEO: आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली

First published: July 11, 2019, 3:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading