Home /News /entertainment /

VIDEO: इब्राहिम अली खानसोबत कारमध्ये दिसून आली पलक तिवारी, कॅमेरा पाहून लपवलं तोंड

VIDEO: इब्राहिम अली खानसोबत कारमध्ये दिसून आली पलक तिवारी, कॅमेरा पाहून लपवलं तोंड

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी दिसून येत आहेत.

  मुंबई, 22 जानेवारी-   बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  सध्या अनेक स्टारकिड्स   (Starkids)  प्रसिद्धीस येत आहेत. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी   (Shweta Tiwari Daughter)   पलक तिवारी   (Palak Tiwari)  आपल्या 'बिजली बिजली' या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. दुसरीकडे अभिनेता सैफ खानचा मुलगा   (Saif Ali Khan Son)  इब्राहिमसुद्धा  (Ibrahim Khan)   प्रचंड चर्चेत असतो. दरम्यान इब्राहिम आणि पलक एकाच कारमध्ये स्पॉट करण्यात आले. दोघेही डिनरसाठी एकत्र आले होते. व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी दिसून येत आहेत. पलक आणि इब्राहिम एकाच कारमध्ये बसले आहेत. एकीकडे इब्राहिम कारमध्ये बसून स्माईल देत आहे. पलक आपला चेहरा लपवताना दिसून येत आहे. प्रसिद्ध सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये इब्राहिम आणि पलकला एकत्र पाहून या दोघांमध्ये नेमकं काय चाललंय हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर दुसरीकडे पलक आपलं तोंड लपवताना दिसली. त्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
  सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यामध्ये पलकला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. एकाने कमेंट करत लिहिलं आहे, 'वाटतं तू आईला सांगून नाही आलीस म्हणून तोंड लपवत आहेस'. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, 'फक्त डिनरसाठी गेला होता ना यात काय तोंड लपवायचं'. तर आणखी एकाने लिहिलं, 'ही एवढी ओव्हरऍक्टिंग का करत आहे'. तर आणखी दुसऱ्याने लिहिलं, 'ड्रग्सची रेड पडली का?' तर तिसऱ्याने लिहिलं, 'करिना तुला सल्ला देईलच याला डेट करू नको असा'. अशाप्रकारे अनेक कमेंट करत नेटकरी पलकला टार्गेट करत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment

  पुढील बातम्या