कतरिनानं दिलेली 'ही' गोष्ट आजही वापरतो सलमान खान, टी-शर्टवर खर्च करतो फक्त एवढे रूपये

कतरिनानं दिलेली 'ही' गोष्ट आजही वापरतो सलमान खान, टी-शर्टवर खर्च करतो फक्त एवढे रूपये

वयाच्या 53 व्या वर्षीही चाहत्यांमधील सलमानची क्रेझ कायम असल्याचं यावरून दिसून आलं. सलमानला अनेकजण स्टाईल आयकॉन मानतात.

  • Share this:

मुंबई, 06 जून : अभिनेता सलमान खानचा नुकत्याच रिलीज झालेल्या 'भारत' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत 42 कोटींची घसघशीत कमाई केली. वयाच्या 53 व्या वर्षीही चाहत्यांमधील सलमानची क्रेझ कायम असल्याचं यावरून दिसून आलं. सलमानला अनेकजण स्टाईल आयकॉन मानतात. खरं तर बॉलिवूडमध्ये असा एकही कलाकार नाही जो एकदा वापरलेले कपडे पुन्हा घालतो. पण सलमान याला अपवाद आहे. पण तरीही तो तरूणाईसाठी स्टाइल आयकॉन आहे. सलमान अनेकदा एकदा वापरलेला टी शर्ट पुन्हा घालतो. त्यानं काय घातलं आहे याचा त्याला काहीही फरक पडत नाही असं सलमान सांगतो.

'भारत'च्या प्रमोशन प्रीमियरच्या वेळी सलमाननं ब्लॅक कलरचं जॅकेट आणि जीन्समध्ये दिसला होता. यावेळी त्यानं त्याच्या स्टायलिंग सेन्सवरही गप्पा मारल्या. सलमान म्हणाला, 'मी अन्क आर्टिकल पाहिलेत ज्यामध्ये महिलांच्या ड्रेसवर सर्कल करून असं सांगितलं जातं की हिने या कार्यक्रमात हे कपडे घातले होते आणि आता हुबेहूब तसाच ड्रेस या कार्यक्रमात घातला आहे.'

स्टुडंटच्याच प्रेमात पडलेल्या 'या' अभिनेत्याची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

सलमान पुढे म्हणाला, 'जर हे असं ते माझ्यासोबत करू लागले तर हे त्यांना सगळीकडेच करावं लागेल. कारण मी आजही ते शूज वापरतो. जे मी  5 वर्षांपूर्वी घातले होते. त्याच काळ्या टी शर्ट आणि जीन्समध्ये तुम्ही अनेक वर्ष पाहू शकता. माझं एक शर्ट 500 रुपयांचं असतं आणि ते मी अनेक वर्ष वापरतो. यात चुकीच काहीही नाही. माझे बेल्ट सुद्धा 20 वर्ष जुने आहेत. कतरिना काही वर्षांपूर्वी दिलेला बेल्ट मी आजही वापरतो.'

सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा व्यक्त झाली काजोल, इन्स्टाग्रामवर लिहिली अशी पोस्ट

 

View this post on Instagram

 

‪Starting the shooting schedule of #Bharat in Malta, lovely country .‬

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानची प्रमुख असलेल्या 'भारत'ने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत 42 कोटींचा गल्ला जमवला. ही सलमानच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग होती. कोरियन फिल्म 'ओड टू माय फादर'चा रिमेक असलेल्या या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कार्तिक आर्यन नाही तर 'या' व्यक्तीसोबत साराला घालवायचंय तिचं संपूर्ण आयुष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading