काळजी नको, मी सुरक्षीत आहे, दीपिका पदुकोनचं ट्विट

काळजी नको, मी सुरक्षीत आहे, दीपिका पदुकोनचं ट्विट

मी सुरक्षित आहे, काळजी करणाऱ्या सर्वांचे आभार. ट्विटरवरून दीपिकानं दिली माहिती.

  • Share this:

मुंबई,ता.13 जून : मुंबईतील प्रभादेवी इथल्या 'बो मोंड' टॉवरला आग लागलीय. या टॉवरमध्ये 26 व्या मजल्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोनचा फ्लॅट असल्यानं त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.

दीपिका कुठे आहे? सुरक्षित आहे का असे प्रश्न सोशल मीडियावरून तिचे चाहते विचारत होते, त्या सर्वांना ट्विटरवरून दीपिकानं उत्तर दिलंय.

मी सुरक्षित आहे, काळजी करणाऱ्या सर्वांचे आभार. घटनास्थळी आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्याचं का करणाऱ्या फायर ब्रिगेडच्या जवानांच्या प्रयत्नांना यश येवो अशी प्रार्थना असं दीपिकानं ट्विट केलंय.

दीपिकाशिवाय या इमारतीत बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि राजकीय नेत्यांचेही फ्लॅट्स असल्यानं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

 

 

First published: June 13, 2018, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading