मुंबई, 28 डिसेंबर: बॉलिवूडचा सुपरस्टार सोनू सूद (Sonu Sood) हा अतिशय उत्तम कलाकार आहेच शिवाय माणूस म्हणूनही तो अतिशय साधा आहे. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सोनूने गरीब मजुरांना केलेली मदत सर्वांनाच माहित आहे. अनेकांच्या आयुष्यात तो देवासारखा धावून गेला. याच अनुभववारील सोनू सूदचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. आय एम नो मसीहा (I Am No Messiah) असं या पुस्तकाचं वाव आहे. लॉकडाऊनमध्ये त्याला मदतीदरम्यान आलेले अनुभव या पुस्तकामधून शेअर केला होता.
सोनू सूदचा विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका बुक स्टॉलवर गेला असल्याचं दिसत आहे. या स्टॉलमध्ये काही पुस्तकांवर त्याचा ऑटोग्राफही आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये तो पुस्तकाबद्दल माहिती देत आहे. तसंच हे पुस्तक नक्की वाचा असं आवाहनही केलं आहे. आय एम नो मसीहा हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित झालं आहे.
Massiah Is Here
Sonu Sood Sir Spotted At Mumbai Airport❤️ #SonuSood #IAmNoMessiahBook @SonuSood #IAmNoMessiah #HERO #Book #SonuSoodRealHero #Messiah#MumbaiAirport #Bollywood pic.twitter.com/uWujX8Fs4Z — SONU SOOD FC INDIA (@FcSonuSood) December 26, 2020
लॉकडाऊननंतर बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं सोनू सूदच्या लक्षात आलं. अशा बेरोजगार तरुणांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सोनू सूदने त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ई रिक्षाही दिल्या. सिद्धीपेटमध्ये सोनू सूदचं देऊळ बांधण्यात आलं आहे. याबद्दल सोनू म्हणतो, ‘लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. तुमचं हे प्रेम नेहमी असंच मिळत राहू देतं.’ अशी भावना सोनूने व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.