बाहुबली-2 पाहिला नाही म्हणून कामावरून काढून टाकलं

बाहुबली-2 पाहिला नाही म्हणून कामावरून काढून टाकलं

हैदराबादमध्ये एका कंपनीच्या मालकाने बाहुबली-2 हा चित्रपट पाहिला नाही म्हणून 29 वर्षाच्या महेश बाबू याला कंपनीतून काढून टाकलं.

  • Share this:

05 मे : खरं तर चित्रपट हे फक्त मनोरंजनासाठी असतात त्याचा कुणाच्याही वैयक्तिक आयुष्याची संबंध नसतो पण हैदराबादमध्ये एका कंपनीच्या मालकाने बाहुबली-2 हा चित्रपट पाहिला नाही म्हणून 29 वर्षाच्या महेश बाबू याला कंपनीतून काढून टाकलं. चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झाले पण तरीही बाहुबली-2 नं पाहिल्याने कामावरुन बेदखल केलं गेलं.

आणखी आश्चर्य म्हणजे महेशने चित्रपट पाहावा यासाठी कंपनीने अनेक प्रयत्न केले. पण महेशनी त्यांचे सगळे प्रयत्न फेटाळून लावले. या कारणास्तव कंपनीने महेशला नोटीस दिली होती. पण त्याचं समाधानकारक उत्तर न दिल्याने कंपनीने त्याला गुलाबी स्लिप दाखवत घरचा रस्ता दाखवला. कंपनीने महेशच्या या कृत्यास गुन्हेगारी असं नाव देत त्याला हा गुन्हा सुधारण्याची संधीही दिली होती पण त्याने तीही फेटाळली असं कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

महेश बाबू याचा मित्र राजमुल्लिटर यांच्या म्हणण्यानुसार...

आमच्या बॉसने त्याला संपूर्ण दिवस दिला, त्याला त्याच्या पदाचा वापर करुन हव तसं काम करण्याची परवानगी दिली. त्याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या कामाच्या डेस्कजवळ बाहुबली - 2 चे पोस्टर लावले आणि "जाओ कभी थिअटर में" अशी टॅगलाईन ही दिली पण त्याने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं.

आम्ही त्याला आणखी दबावाखाली आणले तेव्हा त्याने विचारले की,  बाहुबली - 2 पाहिल्यावर मला कमी कर भरण्याचा लाभ होणार आहे का?  आणि हे कंपनीसाठी अपमानास्पद होते. याच अपमानामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 08:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...