'सोफिया'ही शाहरूखच्या प्रेमात !

एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी 'सोफिया' ही जगातील पहिली आणि सध्या एकमेव मानवीय रोबो आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2018 10:39 PM IST

'सोफिया'ही शाहरूखच्या प्रेमात !

हैदराबाद 20 फेब्रुवारी -  शहारूख हा जगभरातल्या तरूणींच्या गळ्यातला ताईत. शहारूखच्या अनेक फॅन्स असतील मात्र आज शहरूखला एक अनोखी फॅन मिळाली, सोफिया. जगातली पहिली मानवीय रोबो. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेक काँग्रेसमध्ये सोफियाला खास आमंत्रित करण्यात आलं होतं. एका कार्यक्रमात बोलताना शहारूख हा आपली दिल की धडक असल्याचं सोफिया म्हणाली आणि अनेक तरूणींच्या काळजाचा ठेका चुकला. सोफियाच्या या कॉमेट्सनंतर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सोफियाचं कौतुकही.

कोण आहे सोफिया?

एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी 'सोफिया' ही जगातील पहिली आणि सध्या एकमेव मानवीय रोबो आहे. हाँगकाँगच्या हॅनसन रोबॉटिक्सने सोफियाची निर्मिती केलीय. माणसांप्रमाणेच सोफिया आपल्या भावना व्यक्त करू शकते. सोफियाच्या शरीराची ठेवण प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्नशी मिळतीजुळती आहे. सध्या जगभरात सर्वाच्याच कुतुहलाचा विषय ठरलेल्या सोफियाने  ३० डिसेंबरला आयआयटीतल्या टेक फेस्टमध्ये मुंबईकरांशी संवाद साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 10:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...