मुंबई, 30 नोव्हेंबर : 'गँग्स ऑफ वासेपुर'मधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी. या अभिनेत्रीने मोजक्याच परंतु दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. आपल्या लुक्स आणि फॅशनमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी. हुमाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच तिचा 'मोनिका ओ माय डार्लिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ओटीटी वर हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला असून त्याच्या यशाची पार्टी नुकतीच पार पडली. याला हुमाने देखील हजेरी लावली होती. पण यातील तिचा लूक पाहून ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.
अभिनया सोबतच हुमा आपल्या लुक्स बाबतीत सुद्धा चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनते. पण आता हुमा कुरेशी उर्फी जावेदची फॅशन फॉलो करते की काय अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. हुमाने मोनिका ओ माय डार्लिंग" च्या पार्टीत बोल्ड लूक केला होता. यावेळी हुमाने रेड कलरचा ड्रेस घातला होता. पण तिची ही स्टाईल नेटकऱ्यांना फारसं पसंत पडलेली नाही. नेटकऱ्यानी तिची तुलना थेट उर्फी जावेदशी केली आहे.
हेही वाचा - Raveena Tandon : वाघांचे फोटो काढणं रविना टंडनला पडलं महागात; 'त्या' व्हिडीओमुळे होणार चौकशी
उर्फीने सुद्धा तसाच सेम ड्रेस पण काळ्या कलरमध्ये ड्रेस परिधान केला होता. या सेम फॅशनमुळे हुमा ट्रोल झाली आहे. हुमाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच ट्रोलिंगचा भडिमार सुरू झाला आहे "हुमा तु उर्फीला फॉलो करते की काय?", ''अगं हुमा उर्फीची फिगर कुठे आणि तुझी कुठे", " बहुतेक टेलरकडे एवढाच कपडा होता" अशा कमेंट तिच्या व्हिडिओवर आल्या आहेत.
View this post on Instagram
एक म्हणतो "हुमा हा ड्रेस गरमी मध्ये ठिक आहे आता तर थंडी आहे", तर दुसऱ्याने म्हंटले आहे .. "पण एक समजतं नाही इतक्या टाईट ड्रेसमध्ये ही श्वास कशी घेते आहे. तर काहीना उर्फीची चिंता लागली आहे.तू तिची फॅशन केली तर ती काय करणार असेही अनेकांचे म्हणणे आहे. ''हुमा या अश्या विचित्र फॅशनसाठी आमची उर्फी बेस्ट आहे, तुला नाही जमणार'' अशा अनेक कमेंट्सचा पाऊस तिच्यावर पडला आहे.
हुमा याआधी लोकप्रिय वेब सीरिज 'महाराणी 2' मध्ये दिसली होती. तसेच तिचा आणि सोनाक्षीचा 'डबल एक्सएल' हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज झाला आहे. येणाऱ्या काळात हुमा कुरेशी "तरला" आणि "पुजा मेरी जान" या आगामी चित्रपटात दिसणार आहे. "तरला" हा चित्रपट प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांच्यावर आधारित आहे. हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.