अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणजे एक गोड चेहऱ्याची, साधी-सरळ, हास्य चेहऱ्याची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या याच साधेपणावर लोक फिदा झाले होते. आजही चाहते त्यांना तितकंच प्रेम आणि आदर देतात. तसेच लोक आजही तिला सलमान खानची वहिनी म्हणूनच ओळखतात. इतका तिच्या 'हम आपके है कौन' चित्रपटातील भूमिकेचा लोकांवर प्रभाव आहे. आज या मनोरंजन सृष्टीत येऊन रेणुका यांना तब्बल ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी चाहत्यांचं आभार मानलं आहे. रेणुका शहाणे यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, 'आज मला या इंडस्ट्रीमध्ये येऊन ३४ वर्षे पूर्ण झाली. आणि मी आजही पडद्यावर काम करत आहे. तुमच्या सर्वांच्या अफाट प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम नेहमी करत राहा. हीच विनंती'. अशा आशयाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. (हे वाचा:'कोणाला आहे Filterची गरज?' अभिनेत्री Amruta Khanvilkar ने सांगितलं सौंदर्याचं...) रेणुका शहाणे यांनी 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी चित्रपटातू आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तसेच दूरदर्शनवरील 'सुरभी' हा शो त्यांनी होस्ट केला होता. यामुळे त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपट केले. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती राजश्री प्रोडक्शनच्या 'हम आपके है कौन' या चित्रपटामुळे. सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने रेणुका शहाणे यांच्या करिअरला मोठा टर्न दिला होता. या चित्रपटात रेणुका यांनी माधुरीच्या बहिणीची आणि सलमान खानच्या वाहिनीची भूमिका साकारली होती. यामध्ये मोहनिश बहेल त्यांच्या पतीच्या भूमिकेत होते. या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही लोकांना लक्षात आहे. (हे वाचा:ती परत आलीये' मालिकेत असे चित्रित होतात धडकी भरवणारे सीन; सेटवरील VIDEOहोतोय... ) रेणुका शहाणे या एक महाराष्ट्रीयन अभिनेत्री आहेत. या मराठमोळ्या अभिनेत्रीने मराठीसोबतच हिंदीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रेणुका शहाणे यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं. तर त्यांची दोन लग्न झाली आहेत.त्यांनी पहिल्यांदा लेखक असणाऱ्या विजय केंकरे यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांनतर त्यांनी अभिनेता आशुतोष राणासोबत लग्न केलं आहे.या जोडप्याला २ मुले आहेत.रेणुका शहाणे सध्या क्राईम पेट्रोलमध्ये झळकत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress