HSC result : 'परश्या.... आर्ची पास झाली रे...', पाहा रिंकूचा निकाल

HSC result : 'परश्या.... आर्ची पास झाली रे...', पाहा रिंकूचा निकाल

रिंकूने आपल्या व्यग्र वेळापत्रकातून अभ्यासासाठी वेळ काढत यंदा १२ वीची परीक्षा दिली होती. पण तिच्या या कष्टाचं चिज झालं असंच म्हणावं लागेल.

  • Share this:

मुंबई, 28 मे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. बोर्डाच्या अध्यक्षांनी दुपारी 11 वाजता निकाल जाहीर केले. यंदाचा राज्याचा बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्याला किती टक्के मिळाले हे पाहण्यासाठी उत्सुक असताना सैराटफेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूला किती टक्के मिळाले हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे. रिंकूने आपल्या व्यग्र वेळापत्रकातून अभ्यासासाठी वेळ काढत यंदा १२ वीची परीक्षा दिली होती. पण तिच्या या कष्टाचं चिज झालं असंच म्हणावं लागेल. यंदाच्या १२ वीच्या परीक्षेत रिंकू उत्तीर्ण झाली असून तिला ८२ टक्के मिळाले आहेत.

रिंकूच्या १२ वीच्या निकालाची जेवढी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे तेवढीच चर्चा तिच्या १० वीच्या निकालाचीही होती. चित्रीकरणामुळे आर्चीला दहावीत नियमितपणे शाळेत जाता आलं नव्हतं. त्यामुळे तिने दहावीची परीक्षा बाहेरूनच दिली होती.दरम्यान, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे निकाल तुम्ही News18 Lokmat या आमच्या वेबसाईटवर थेट बघू शकता. ऑनलाईन निकाल कसे बघायचे यासाठी स्क्रोल डाऊन करून खालचा परिच्छेद पाहा. गेल्या वर्षी 30 मे रोजी निकाल लागला होता. यंदा दोन दिवस अगोदर बारावीचा रिझल्ट विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे. दुपारी ठीक 1 वाजल्यापासून निकाल इथे खाली दिलेल्या लिंकवर पाहता येईल.

HSC Result : इथे चेक करा तुमचा निकाल फक्त एका क्लिकवरकसा पाहायचा निकाल?


विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्रावर म्हणजेच अॅडमिट कार्डवर असलेला त्यांचा रोल नंबर किंवा परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर हा निकाल पाहता येणार आहे. याशिवाय दिलेल्या फॉरमॅटमध्ये जन्मतारीखसुद्धा टाकावी लागणार आहे. हे दोन्ही रकाने भरल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. News18 Lokmat च्या वेबसाईटवर निकाला पाहण्यासाठी फक्त नाव, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी टाकावा लागणार आहे. तो टाकताच तुमचा निकाल पाहता येईल.

थरारक VIDEO : हजारोंच्या गर्दीत अचानक माजलेला वळू घुसला आणि...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 01:25 PM IST

ताज्या बातम्या